प्रतिक कांबळे
पवईतील तरुण कलाकार यांनी या अगोदर आपल्या कलेतून बरेच वर्ड रेकॉर्ड वर आपले नाव कोरले आहे. त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंती निमित्त रयतेचे राजे यांना आपल्या कलेतून राऊत यांनी मानाचा मुजरा केला आहे.
चेतन राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त ५०,००० मातीच्या पणत्या वापरत तब्बल ४० × ३० फुट आकाराचे महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे पोर्ट्रेट साकारले आहे. यामध्ये चेतन यांनी लाल, पिवळा, पांढरा, काळा, हिरवा, निळा अशा सहा रंगछटा वापर हे पोर्ट्रेट पुर्ण केले आहे.
हे पोर्ट्रेट तयार करण्यासाठी चेतन राऊत, सुरेखा राऊत, सिद्धेश रबसे, कुणाल घाडगे, मयुर अंधरे, प्रमिला जंगले, पुजा लहाने, निशिकांत राऊत, निशांत गावित, सिद्धी गावित, निशिता पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
हे पोर्ट्रेट प्रेक्षकांनसाठी १८,१९,२० या दिवसात छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तलाव पाळी, ठाणे (पश्चिम) येथे ठेवण्यात आले आहे. महाराजांच्या ३९१ व्या जयंती निमित्त मी ५० हजार मातीच्या पणत्या वापरून ही कलाकृती साकारली आहे. या कलेतून मी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा केला आहे. हे पोर्ट्रेट बनवण्यासाठी आमच्या टिमला ४८ तासाचा कालावधी लागला असून ही कलाकृती ठाणे येथे प्रेक्षकांना बघण्यासाठी ठेवण्यात आली आहे. असे आमच्याशी बोलताना चेतन राऊत यांनी सांगितले.