Tuesday, March 10, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारात योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

January 21, 2022
in घडलं-बिघडलं
0
Aprreciation of MPS officers and employees by Marathi Language Department

मुक्तपीठ टीम

मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबरच भाषेचा प्रचार आणि प्रसार करुन भाषा संस्कृती संवर्धनासाठी योगदान देणारे शासकीय सेवेतील मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे मराठी भाषा विभागातर्फे कौतुक करण्यात आले.

Aprreciation of MPS officers and employees by Marathi Language Department            

मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या हस्ते पुस्तक आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलींद गवादे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            

मराठी भाषा विभागातर्फे दिनांक १४ ते २८ जानेवारी या दरम्यान ‘ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा‘ निमित्त राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले होते. आजचा कार्यक्रम मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत पार पडणार होता. मात्र, राज्यमंत्री महोदय प्रकृती अस्वस्थतेमुळे येऊ शकले नाहीत. या कार्यक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा पाठविल्या आणि सर्व सन्मानार्थींचे अभिनंदन केले आहे. शासकीय कर्मचारी आणि अधिकारी आपले कामकाज सांभाळून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी योगदान देतात त्यांचे कौतुक केले पाहिजे, अशी सूचना मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केली होती त्यानुसार मागच्या वर्षी पासून हे पुरस्कार देण्यात येत आहेत.

Aprreciation of MPS officers and employees by Marathi Language Department            

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्यानुसार मंत्रालयात अभिवाचन व काव्य वाचन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. अभिवाचन स्पर्धेचा विषय ‘स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि स्वातंत्र्योत्तर भारत‘ हा होता तर ज्येष्ठ कवयित्री  शांता शेळके आणि कवी वसंत बापट यांनी रचलेल्या कवितांचे वाचन करण्यासाठी काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

            

अभिवाचन स्पर्धेत शिल्पा नातू, अतुल कुलकर्णी,  मंगल नाखवा, पूजा भोसले, संजना चाळके, विजयी झाले. काव्यवाचन स्पर्धेत  कौमुदी मरगज, अनिरुद्ध देशपांडे, शिल्पा नातू, संगीता बेडेकर,  पूजा भोसले, अतुल कुलकर्णी, आणि  अनिल आव्हाड विजयी झाले. यावेळी विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र देण्यात आले.या दोन्ही स्पर्धांसाठी परिक्षक म्हणून श्रीनिवास नार्वेकर व राजश्री पोतदार यांनी काम पाहिले.

Aprreciation of MPS officers and employees by Marathi Language Department

सन्मानपत्राने सन्मानित झाले शासकीय अधिकारी कर्मचारी            

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी, कर्मचारी हे आपल्या कामकाजाच्या माध्यमातूनही मराठी भाषेच्या संवर्धनात मोठ्या प्रमाणात हातभार लावत असतात. त्यांच्या या कामाची दखल शासनाने घेतली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रभारी संचालक दयानंद कांबळे यांनी मराठीतील बातमीला नवमाध्यमांची जोड देऊन पत्रकारितेला नवीन आयाम दिला आहे. त्यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून जगभरातील मराठी भाषिकांना एकत्रित जोडण्याचे काम केले आहे. उपसंचालक सीमा रनाळकर या प्रदर्शन शाखेच्या प्रमुख आहेत. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने विविध माध्यमांसाठी त्यांनी संकल्पना चित्रे तयार केले. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी मराठी भाषेतून विपूल लिखाण केले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील या तीन अधिकाऱ्यांसह मंत्रालयातील इतर कर्मचारी आणि अधिकारी यांचे सन्मानपत्र आणि पुस्तक देऊन कौतुक करण्यात आले.

Aprreciation of MPS officers and employees by Marathi Language Department            

यात  रोहन शंकर जळणकर, लिपिक, गृह विभाग, सारीका चौधरी, लिपिक, विधि व न्याय विभाग,  कालिदास बांदकर, सहायक कक्ष अधिकारी, जलसंपदा विभाग, डॉ. स्नेहा चुरी, कक्ष अधिकारी, नियोजन विभाग, वैभव पाटील, कक्ष अधिकारी, अभियान संचालक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, अतुल कुलकर्णी, कक्ष अधिकारी, वित्त विभाग, लिना संखे, अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग, प्रविण पंडित, लिपिक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग यांचा समावेश आहे.

            

मंत्रालयातील वाचकांना आवडीचे पुस्तक उपलब्ध करुन देणारे पुस्तक विक्रेते अनिल सुर्वे, मंत्रालय आवारात अभिजात मराठी भाषेचे दालन उभारणारे नेपथ्यकार सुनिल देवळेकर आणि मराठीतून स्वाक्षरी शिकविणारे कला शिक्षक गोपाल वाकोडे यांना यावेळी विशेष प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.


Tags: MaharashtraMarathi Language Conservation FortnightMarathi Language Departmentमराठी भाषा विभागमराठी भाषा संवर्धन पंधरवडामहाराष्ट्र
Previous Post

“सागरी जैवविविधता जपणुकीत कांदळवन प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

देशात दुर्मिळ शस्त्रक्रिया! निरोगी व्यक्तीचा ‘मल’ वापरून वाचवले रुग्णाचे प्राण!

Next Post
sir gangaram hospital

देशात दुर्मिळ शस्त्रक्रिया! निरोगी व्यक्तीचा 'मल' वापरून वाचवले रुग्णाचे प्राण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!