मुक्तपीठ टीम
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियात फिटर, टर्नर, मशीनिस्ट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वेल्डर, सीओपीए या पदांवर एकूण १०७ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. नोकरीचे ठिकाण राजस्थान येथे आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २७ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवाराने, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेला असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १४ ते २४ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्जाचा पाठविण्याचा पत्ता
एचआर अधिकारी अणु प्रशिक्षण केंद्र, रावतभटा राजस्थान साइट एनपीसीआयएल, पीओ-अनुशक्ती, वाया-कोटा (राजस्थान), पिन- ३२३३०३
अधिक माहितीसाठी
आयसीटीच्या अधिकृत वेबसाइट https://www.npcil.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.