मुक्तपीठ टीम
नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये वेगवेगळ्या पदांवर अप्रेंटिसशिपसाठी एकूण १७३ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १९ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण २) ६५% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १४ ते २१ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
द ऑफिसर-इन-चार्ज, डॉकयार्ड अॅप्रेंटिस स्कूल, नेव्हल शिप रिपेअर यार्ड, नेव्हल बेस, कारवार, कर्नाटक-५८१३०८
अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiannavy.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.








Subscribe