मुक्तपीठ टीम
रेल्वे भरती बोर्डाने अॅप्रेंटिसच्या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ०५ मार्च २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगार संधी विषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये एनसीव्हिटी (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/पीएएसएए/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/एमएमटीएम/टूल आणि डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/आयटी आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स)
वयोमर्यादा
०१ जानेवारी २०२१ रोजी १५ वर्षे ते २४ वर्षापर्यंत. एससीएसटी प्रवर्गासाठी ०५ वर्षे सूट, तर ओबीसीसाठी ०३ वर्षे सूट देण्यात आली आहे.
शुल्क
जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी या अर्जाचे शुल्क १०० रुपये आहे. तर एससी/एसटी/पीडब्लूडी/ महिला उमेदवारांसाठी या अर्जाचे शुल्क आकारलेले नाहीत.
अधिक माहितीसाठी मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://cr.indianrailways.gov.in/ माहिती मिळवू शकता.