मुक्तपीठ टीम
इंडियन ऑईलमध्ये टेक्निशियन अॅप्रेंटिस, ट्रेड अॅप्रेंटिस (एचआर/ अकाउंटेंट), डाटा एंट्री ऑपरेटर/ डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर या पदांवर एकूण ४६९ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) टेक्निशियन अप्रेंटिस- संबंधित इंजिनीअरिंग डिप्लोमा, २) ट्रेड अप्रेंटिस- पदवीधर/ बी.कॉम
डाटा एंट्री ऑपरेटर/ डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाइट https://www.iocl.com/ वरून माहिती मिळवू शकता.