मुक्तपीठ टीम
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, कारपेंटर, प्लंबर, वायरमन, डिझेल मेकॅनिक अशी आणखीही पदं आहेत. या आणि इतर पदांसाठी एकूण २५० जागांसाठी ही अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १४ ते २४ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या मेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.npcil.nic.in वरून माहिती मिळवू शकता.