मुक्तपीठ टीम
जर तुम्ही १२ वी पास आहात व सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्कृष्ट संधी आहे.पश्चिम मध्य रेल्वेने ट्रेंड
अॉप्रेंटीस पदावर भरतीसाठी ऑनलाइन अधिसूचना जारी केली होती. त्या अंतर्गत फिटर,वेल्डर,इलेक्ट्रीशियन,पेंटर,सुतार,प्लंबर,ड्राफ्टमेन, टेलर,मेकनिक,आणि आॉपरेटर सोबतच आणखी पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. याअंतर्गतच एकूण १६५ पदांसाठी नेमणूक केली जाईल. त्यासाठी ३० मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. या रोजगारसंधीच्या अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
या रोजगार संधीसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार पश्चिम मध्य रेल्वेच्या अधिकृत पोर्टल @wcr.Indian railways.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.
पश्चिम मध्य रेल्वेच्या जारी केलेल्या अधिसूचनेनुसार फिटर १५,वेल्डर २८,इलिक्ट्रीशियन १८,पेंटर १०,कारपेंटर २०,प्लंबर ०८,टेलर ०५,मैकेनिक ०४ सोबतच अन्य पदांवर नेमणूक केली जाईल.ह्या पदासाठी अर्ज करणारया उमेदवारांना १२ पास असण्यासोबतच संबंधित व्यापारात आयटीआय प्रमाण पत्र असणे गरजेचे आहे.ह्या व्यतिरीक्त आरक्षित वर्गातील उमेदवारांना सरकारच्या नियमांनुसार सूट दिली जाईल.
शुल्क
ह्या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना १०० शुल्क आकारावे लागेल.त्याचबरोबर एससी आणि एसटी प्रवर्ग, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना ७० रुपये फी भरावी लागेल. त्याचबरोबर या भरती संबंधित अधिक तपशील तपासण्यासाठी उमेदवार अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकतात.
पाहा व्हिडीओ: