मुक्तपीठ टीम
संरक्षण खात्याच्या वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरीत पदवीधर आणि टेक्निशियन अॅप्रेंटिसशिपसाठी भरती आहे. ही भरती १० जागांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर अॅप्रेंटिससाठी बी.ई/ बी.टेक मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल तसेच टेक्निशियन अप्रेंटिससाठी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेल्यांसाठी संधी आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारलेले नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: जनरल मॅनेजर, ऑर्डिनन्स फॅक्ट्री वरणगाव, तालुका- भुसावळ, जिल्हा जळगाव [एमएस] – ४२५३०८
अधिक माहितीसाठी वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या अधिकृत वेबसाइट www.ofb.gov.in वरून माहिती मिळवू शकता.