मुक्तपीठ टीम
डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये अप्रेंटिसशिपच्या १८२ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ३१ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, वेल्डर- १) ८वी उत्तीर्ण २) आयटीआय (वेल्डर) उर्वरित ट्रेड- (i) ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण. (ii) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय वेल्डर- १५ ते २२ वर्षे, उर्वरित ट्रेड- १५ ते २४ वर्षे असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाईल.
अधिक माहितीसाठी डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्सच्या अधिकृत वेबसाइट https://dmw.indianrailways.gov.in/वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: