मुक्तपीठ टीम
नाशिक येथे भारतीय हवाई दलात एअर फोर्स अॅप्रेंटिस प्रशिक्षण लेखी परीक्षा या कोर्ससाठी मशीनिस्ट, शीट मेटल, गॅस अॅंड इलेक्ट्रिक वेल्डर, रेडिओ रडार एअरक्राफ्ट मेकॅनिक, कारपेंटर, इलेक्ट्रिशियन एअरक्राफ्ट, फिटर/ मेकॅनिक मशीन टूल मेंटेनंस या ट्रेडमध्ये एकूण १०८ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०५ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण नाशिकमधील ओझर हे ठिकाण आहे
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- ५०% गुणांसह १०वी/ १२वी उत्तीर्ण
- ६५% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १४ ते २१ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइट https://indianairforce.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://www.apprenticeshipindia.gov.in/
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1tOC-Sl-U7GJDaAEDiG7KLpq9_qjniD1_/view








Subscribe