मुक्तपीठ टीम
आता अॅपल २० इंच मोठ्या फोल्डेबल डिस्प्लेसह एका डिव्हाइसवर काम करत आहे. ज्यामुळे संपूर्ण फोल्डेबल लँडस्केप बदलेल. डिस्प्ले सप्लाय चेन कन्सल्टंट्सचे विश्लेषक रॉस यंग यांच्या अहवालात असे सुचवण्यात आले होते की, अॅपल मोठ्या, फोल्डिंग स्क्रीनसह डिव्हाइस विकसित करण्याची योजना आखत आहे.
हे डिव्हाइस २०२६ पर्यंत येऊ शकते आणि ते ‘आयपॅड/ मॅकबुक हायब्रिड’ असेल. अॅपल डिव्हाइसमध्ये ड्युअल-स्क्रीन डिस्प्ले असेल, ज्यामध्ये फिजिकल कीबोर्ड आणि ट्रॅकपॅड वगळले जाईल आणि टचस्क्रीन यूजर्सना डिव्हाइसवर नेव्हिगेट आणि टाइप करण्यास मदत करेल.
लेनोव्होच्या थिंकपॅड X1 फोल्डमध्ये १३ इंचाचा डिस्प्ले आहे जो मध्यभागी फोल्ड होऊन टचस्क्रीन लॅपटॉप बनतो. काही दिवसांपूर्वी अहवाल समोर आला की, अॅपल २०२५ पर्यंत फोल्डेबल आयफोन पुढे ढकलण्याची शक्यता आहे, कारण कंपनीने फोल्डेबल मॅकबुकवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. अॅपलने अजून फोल्डेबल आयफोन लाँच केलेला नाही, पण असा डिवाइस लवकरच लाँच होणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच, एक नवीन अहवाल सूचित करतो की, फोल्डेबल आयफोनला विलंब झाला आहे.