मुक्तपीठ टीम
जर तुम्ही बाईक रायडर्स आहात आणि लांब पल्ल्याच्या प्रवासावेळी मोटारबाईकला मोबाईल कनेक्ट करता, तर तुमच्यासाठी हे धोकादाय़क ठरु शकतं. अॅपल कंपनीने य़ासंदर्भातला अलर्ट जारी केला आहे. कंपनीने दिलेल्या सूचनेनुसार बाईक रायडर्सनी ऍपलचा फोन हा बाईकला कनेक्ट करु नये, असं केल्याने फोनचा कॅमेरा खराब होऊ शकतो. ऍपल सपोर्ट फोरमने यासंदर्भातली एक पोस्ट जारी केली आहे.
काय आहे तांत्रिक कारण?
- ज्याठिकाणी हायपॉवर मोटार इंजिन चालतं त्याठिकाणी आयफोन ठेवल्यास फोनचा कॅमेरा खराब होऊ शकतो.
- त्यामुळे आयफोन हा बाईकच्या हँडल बारवर किंवा चेचिसवर ठेवू नये, अशा सूचना कंपनीने दिल्या आहेत.
- बाईक हाय ऍप्लीट्यूड वायब्रेशन तयार करते, त्यामुळे एका ठराविक फ्रिक्वेंसीवर आयफोनचा कॅमेरा खराब करु शकतो.
- द वर्जने दिलेल्या रिपोर्टनुसार आयफोनच्या कॅमेरा फिचर ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन (OIS) संबंधितच मोठी अडचण आहे.
- कॅमेरा खराब झाल्याने आयफोनचे फोटो आणि व्हिडिओची क्वॉलिटीही खराब होऊ शकते.
- तसंच वायब्रेशन आणि ऑटो फोकसवरही परिणाम होऊ शकतो.
- हाय वॉल्युम बाईक्ससारख्या सुपर बाईक्स मोठ्या प्रमाणात वायब्रेशन जनरेट करतात.
- त्यातुलनेनं छोटी मोपेड आणि स्कूटर कमी एप्लीट्युड वॉल्यूम जनरेट करतात.
- अशा परिस्थितीत सुपर बाइकना आयफोन कनेक्ट करु नये.