Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

#व्हा अभिव्यक्त! कुठे रिअल लाइफ हिरोइन रिहाना…कुठे डायलॉगबाज कंगना!

February 5, 2021
in featured
0
#व्हा अभिव्यक्त! कुठे रिअल लाइफ हिरोइन रिहाना…कुठे डायलॉगबाज कंगना!

अपेक्षा सकपाळ

अमेरिकन पॉप सिंगर रिहाना सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. खरेतर ही पॉपसिंगर…तरुणाईची धडकन…पण अनेकदा चर्चेत असते ती वेगळ्याही कारणांमुळे. ही कारणे असतात तिच्या माणुसकीची. संगीतातून मिळवलेल्या कमाईतून ही पॉपसिंगर वंचितांसाठी, संकटग्रस्तांसाठी मोकळ्या मनानं खर्च करते. सकारात्मक कार्य करते. यावेळी मात्र ती चर्चेत आली ते वेगळं कारण भलतंच आहे.

रिहाना या वेळी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर केलेल्या ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. काही सेलिब्रिटींचा अपवाद वगळला तर भारतासह जगभरातून तिला पाठिंबा मिळताना दिसत आहे. अशाच सेलिब्रिटींपैकी एक अभिनेत्री कंगना रणौत. तिच नेहमी काही तरी वादग्रस्त बोलून वाद ओढवून घेणारी. अंगाशी आलं की तिला लक्ष्य केलं जाते अशा उलट्या बोंबा मारणारी! तर याच कंगनाने रिहानावर निशाणा साधला. रिहानाविरोधात ट्वीट करत कंगनाने तिला मुर्ख म्हटलं. जाणकारांच्या मते तसं करण्याआधी कंगनानं थोडी माहिती घेतली असती, अगदी गूगल सर्च केले असते तरीही तिला कळले असते की रिहानाला मूर्ख संबोधून तिनेच मूर्खपणा केला आहे.

 

रिहानाचं सेलिब्रिटींना खुपलेलं ट्वीट होतं तरी काय?

शेतकरी आंदोलनासंबंधित बातमी शेअर करताना रिहानाने ट्विटरवर खडा सवाल विचारला, आपण शेतकरी आंदोलनाबद्दल का बोलत नाही? #FarmerProtest हा हॅशटॅगही वापरला. या ट्वीटनंतर ती भारतात चर्चेत आली. विशेष म्हणजे रिहाना अनेकदा सामाजिक मुद्द्यांवर ट्वीट करत असते.
तिच्या ट्विटमध्ये भारताबद्दल, भारत सरकारबद्दल काहीच गैर नव्हते. तरीही कंगनासारखे काही सेलिब्रिटी तिच्यावर तुटून पडले. कंगना थेट तिला मूर्ख म्हणाली तर सचिन तेंडुलकर आणि अन्य काहींनी आडवळणाने उगाच जसे काही तिने देशाच्या कारभारात हस्तक्षेप केला असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला.

 

why aren’t we talking about this?! #FarmersProtest https://t.co/obmIlXhK9S

— Rihanna (@rihanna) February 2, 2021

तिने नुकतेच म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता बळकावल्यावरही ट्वीट केले आहे.

 

my prayers are with you #myanmar! https://t.co/GMYqA5BHM8

— Rihanna (@rihanna) February 2, 2021

रिहाना फक्त तिच्या गाण्यांसाठीच ओळखली जात नाही तर रिहाना तिच्या सामाजिक कामासाठीही तेवढीच ओळखली जाते. विशेषत: कोरोना साथीच्या संकट काळात, तिने पुढे येऊन लोकांना मदत केली.

 

I’m just here to help. 🤷🏿‍♀️#wediditJoe pic.twitter.com/n7KPjClnKv

— Rihanna (@rihanna) January 20, 2021

रिहाना – माणुसकीमुळे रिअल लाइफ हिरोइनही!

  • रिहानाने २०१२ मध्ये क्लारा लिओनेल फाऊंडेशनची स्थापना केली होती.
  • ही संस्था जगभरात शिक्षण आणि इतर कामांसाठी कार्यरत आहे.
  • मार्च २०२० मध्ये कोरोना या महामारीला लढा देण्यासाठी रिहानाच्या फाउंडेशनने ५० लाख डॉलर म्हणजे जवळपास ३६ कोटी रुपये दान केले.
  • कंगना अनेकदा पीडित असल्याचा आव आणते. ह्रतिकसारख्या नायकांवर तोफ डागते, पण रिहाना बकवास करत न बसता घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्यांना मदत करते
  • एप्रिल २०२० मध्ये रिहानाने लॉस एन्जेलिसमधील घरगुती हिंसाचार पीडितांना मदत करण्यासाठी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांच्याशी सहकार्य केले होते.
  • मार्च २०२० मध्येच रिहानाने कोरोना विरोधी एका मोहिमेसाठी दहा लाख डॉलर्स दान केले होते.
  • तिने आणखी एका ठिकाणी २१ कोटी रुपये दान केले होते.
  • लक्झरी आयुष्य जगणारी रिहाना अनेकदा गरजूंना सढळहस्ते मदत करताना दिसते.

 

thank you navy! #5yearsofANTI #ANTIversary pic.twitter.com/OJMgIc66Jy

— Rihanna (@rihanna) January 29, 2021

रिहाना कोण आहे?

    • रिहाना ही कॅरेबियन पॉप सिंगर आहे.
    • रिहानाचं पूर्ण नाव रॉबिन रिहाना फेंटी आहे.
    • २० जानेवारी १९८८ मध्ये बार्बाडोस येथे तिचा जन्म झाला.
    • ट्विटरवर रिहानाचे १० कोटी फॉलोअर्स आहेत.
    • अमेरिकन रेकॉर्ड निर्माता इव्हान रोगन यांनी तिला पहिल्यांदा अमेरिकेत गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी बोलावलं होतं.
    • रिहानाची एकूण संपत्ती ६० कोटी अमेरिकन डॉलर्स आहे. म्हणजे जवळपास ४४ अब्ज रुपयांची ती मालकीण आहे.

 

रिहाना हॉलिवूडची अभिनेत्रीही!

  • रिहाना फक्त पॉप गायिकाचं नाही तर एक चांगली अभिनेत्रीही आहे.
  • हॉलिवूड फिल्म बॅटलशिप आणि Ocean’s 8 सारख्या सिनेमांमध्ये ती झळकली आहे.
  • ३२ वर्षांच्या रिहानाचा फॅन्टी नावाचा स्वतःचा फॅशन ब्रँडही आहे.

 

‘रिहाना’वरील ट्वीट युद्ध

सेलिब्रिटींच्या बोलवत्या धन्यांना काय खुपलं असेल ते दाखवणारे एक ट्वीट:

Be on the side of the farmer’s daughter coming on the tractor 🚜 @rihanna #StandWithFarmers #FarmersAreIndia #FarmersProtest pic.twitter.com/YxJJabNlrm

— Gikki Dhillon (@gikkidhillon) February 5, 2021

कंगनाचे ट्वीट

 

No one is talking about it because they are not farmers they are terrorists who are trying to divide India, so that China can take over our vulnerable broken nation and make it a Chinese colony much like USA…
Sit down you fool, we are not selling our nation like you dummies. https://t.co/OIAD5Pa61a

— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 2, 2021

सचिन तेंडुलकरांचे ट्वीट

 

India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants.
Indians know India and should decide for India. Let’s remain united as a nation.#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda

— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 3, 2021


Tags: Farmer Delhi Protestkangana ranautrihannaदिल्ली शेतकरी आंदोलनबॉलिवुड अभिनेत्री कंगना रणौतरिहाना
Previous Post

#व्हाअभिव्यक्त! तटबंदीचा अर्थ काय ?

Next Post

#मुक्तपीठ शुक्रवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post
Muktpeeth Top 10 News

#मुक्तपीठ शुक्रवारचे 'टॉप-१० व्हायरल बुलेटिन'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!