किरण कृष्णा जंगम
किरण जंगम हे काव्य लेखन करतात. ते माध्यम क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. एका जाहिरात संस्थेमध्ये कॉपीराइटिंगच काम करतात. त्यांना कथा लेखनही आवडतात.
आपण फक्त झाड व्हावं…
हळूहळू उमलेल, कळीचंही फूल होईल.
हळूहळू फांद्यांमधून, एक एक पान येईल.
कुठेतरी एक फळ उगाच झोका घेत असेल.
कुठेतरी एक बीज नवा जन्म घेत असेल.
वारा येईल खेळायला, इथून तिथून सरसर.
एकमेकांना आदळून, पानांची नुसती मरमर.
मूळ शोधत जाईल वाट, जमिनीच्या आत आत.
जमीन कुशीत घेईल त्याला, शेवटी ती आईची जात.
पाऊस पडेल ऊन येईल, ओंजळीत फक्त भरून घ्यावं
जाता जाता माणसाने, एकदातरी झाड व्हावं…