Sunday, February 23, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

अनुराधा पौडवाल…आवाज जेवढा गोड, तेवढंच समाजकार्यही थोर!

June 21, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
gnm (2)

मुक्तपीठ टीम

अनुराधा पौडवाल म्हटले की समोर येतो तो सात्विक चेहरा आणि कानातच नाही तर मनातही गुंजू लागतो गोड आवाज. अप्रतिम असा. गेली अनेक वर्षे अनुराधा पौडवाल सुर्योदय फांऊडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतात.

 

आता कोरोना संकटातही जी आवश्यक ती प्रत्येक मदत करण्याचा अनुराधा पौडवालांचा प्रयत्न होता. मग रामनगरी अयोध्येला ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करणे असो, वा सामान्य गरजवंतांसाठी मदत करणे. अनुराधा पौडवाल नेहमी सक्रिय असतात. नुकत्याच त्यांनी पनवेल महापालिकेला दोन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर भेट दिले. पालिकेच्या आरोग्य विभागाला ऑक्सिजन मशीन सुपूर्द करून अनुराधा पौडवाल यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

 

यावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ.कविता चौतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, सुर्योदय फाउंडेशनचे सेक्रेटरी विवेक मातोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पूनम जाधव, श्रीकांत म्हात्रे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

anuradha paudwal (2)

अनुराधा पौडवालांचे सामाजिक कार्य

  • आपत्कालीन परिस्थितीत शासनाला नेहमीच मदतीचा हात पुढे करत १९८५पासून सुर्योदय फाउंडेशन सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कार्यरत आहे. कोरोनाच्या महाभयंकर काळात मोठ्या प्रमाणात रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासला.
  • त्यामुळे ऑक्सिजन अभावी असंख्य रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.
  • ही अडचण लक्षात घेऊन सर्वोदय फाउंडेशनच्या सर्वेसर्वा तथा जगप्रसिध्द गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी वैद्यकीय उपकरणे भेट स्वरूपात दिली जात आहेत.
  • पनवेल महापालिकेला ५ लिटर क्षमतेचे दोन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर सुपूर्द करण्यात आले.

 

anuradha paudwal (1)

 

तसेच ज्या-ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्याठिकाणी सुर्योदय फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य अविरतपणे सुरू राहील, असा विश्वास सुर्योदय फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केला. अनुराधा पौडवाल यांनी स्वतः पनवेल महापालिकेत येऊन सुर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून दोन ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर दिल्याबद्दल पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Anuradha PaudwalcoronaOxygen Concentratorpanvel muncipal corporationSuryoday Foundationअनुराधा पौडवालऑक्सिजन कॉन्संट्रेटरकोरोनापनवेल महापालिकासुर्योदय फांऊडेशन
Previous Post

फावड्यानं २२ दिवसात २० फूट विहीर खोदणारा मराठी हिंमतवान!

Next Post

मुंबईतील रहेजा रुग्णालयाचं चांगलं काम, किन्नरांचं लसीकरण!

Next Post
gnm (3)

मुंबईतील रहेजा रुग्णालयाचं चांगलं काम, किन्नरांचं लसीकरण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Supreme court
featured

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

by Sushrusha Jadhav
December 22, 2024
0

Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
article

विनयभंगाचा आरोप: कायदा नेमकं काय सांगतो?

December 22, 2024
supreme court

अब्रुनुकसानीचा कायदा आहे तरी कसा? कशी होते कारवाई?

December 22, 2024
Mayur Joshi Article on Book A Stolen Life : Jaycee Dugard

“त्यानं तिचं जीवनच चोरलं…तरीही तिनं त्याला माफ कसं केलं?”

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!