मुक्तपीठ टीम
अभिनेते म्हटलं की ते संवेदनशील असतातच. त्यातही काही जरा जास्तच. त्यामुळे ते प्रसिद्धीमुळे कितीही मोठे झाले तरी अनेकांमधील माणूस जागताच असतो. आता अनुपम खेरांचंच पाहा. ते एका रेल्वे स्थानकावर असताना त्यांना एक चिमुरडा भेटला. त्याच्याशी गप्पा मारताना त्यांना त्याची वास्तव कथा कळली. गप्पा संपवून निघण्यापूर्वी त्यांनी त्याच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च करायचा निर्धार केला आणि तसं जाहीरही केलं. तुम्हीच पाहा नेमकं काय आणि कसं घडलं…
अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते रेल्वे स्थानकावर ५ वर्षाच्या मुलाशी बोलत असल्याचे दिसून येत आहे. या संभाषणात मुलाने जेव्हा आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे उघड केले तेव्हा अनुपम यांनी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. ६६ वर्षीय अनुपम यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “त्यांची हिमांशु नावाच्या या मुलासोबत शिमला जवळच्या जातोग रेल्वे स्थानकावर भेट झाली. त्यांनी हिमांशूची आई उषा यांना वचन दिले आहे की, हिमांशूच्या शिक्षणाचा खर्च अनुपम केअर्स फाउंडेशन उचलेल.”
व्हिडीओमध्ये अनुपमच्या मुलाशी गप्पा
• हिमांशू यावेळी त्यांना ट्रेन्सबद्दल सांगत होता.
• रेल्वेच्या इंजिनविषयी तो त्यांच्याशी बोलत होता.
• अनुपम म्हणतात की, “अरे तू खूप हुशार आहेस. तू खूप बुद्धिमान आहेस.”
• यानंतर अनुपम मुलासह ट्रॅक ओलांडत प्लॅटफॉर्मवर चालले.
• संभाषणात अनुपम यांनी मुलाला विचारले, “तुझे वडील कोठे आहेत?” यावर तो उत्तर देतो, “ते तर वारले आहेत.”
• हे ऐकून अनुपम थोड्या वेळासाठी शांत झाले.
• मुलाच्या आईला मृत्यूचे कारण विचारले असता, ते अपघातात वारले असे कळले.
यापूर्वी अनुपम यांनी त्यांची आई दुलारी खेर यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात त्यांनी मांडलेले मुद्देही भावनात्मक होते.
• जगातील सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आईचा निरोप घेणे.
• ती शिमला येथे राहते, आणि मी मुंबईला जात होतो.
• आम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला.
• या शहरातल्या आमच्या सुरुवातीच्या दिवसांमधल्या तिने मला मनोरंजक गोष्टी सांगितल्या.
• जगातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे पालकांना आनंदित करणे.
• त्यांचे जे आशीर्वाद मिळतात ते न संपणारे आहेत.