मुक्तपीठ टीम
अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. त्याचबरोबर लोकायुक्ताच्या मुद्यावर राज्यातील बोलत असताना आंदोलनाचा इशारा दिला आहे. लोकायुक्त कायदा बनविण्यासाठी लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र, अडीच वर्षे उलटून गेल्यावर देखील अजूनपर्यंत त्यावर काहीच होत नाही आहे अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.
अण्णा हजारे यांनी पुढे म्हटले की, “मुख्यमंत्री यावर बोलायला तयार नाहीत. नेमके काय झाले हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मोठे जनआंदोलन करण्याची गरज आहे असं म्हणत त्यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यात आमची कमिटी तयार झाली असल्याची माहिती अण्णांनी दिली.” अण्णांचे म्हणणे आहे की, लोकायुक्त कायद्याच्या अनुषंगाने सात बैठकाही पार पडल्या होत्या. आता दोन वर्ष उलटून गेल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर बोलण्यास तयार नाही आहेत.