मुक्तपीठ टीम
गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे उद्योग व्यवसायाला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे कामगार वर्गासह उद्योजकांकडून देखील संपूर्ण लॉकडाऊन करण्याला विरोध करण्यात येत होता. छोट्या व्यवसायकांपासून ते महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांनी देखील लॉकडाऊनला विरोध दर्शविला होता. त्यानंतर आता उद्योगपती अनिल अंबानी यांचे सुपुत्र अनमोल अंबानी यांनी महाराष्ट्रातील सोयीच्या लॉकडाऊनवर टीका केली आहे.
अनमोल अंबानीने आज काही ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांवर टीका केली आहे. त्यांनी काही उदाहरणे देत विरोधाभास दाखवून दिला आहे.
“चित्रपटांचे शूटिंग सुरू आहे, खेळाडूंचे क्रिकेट सुरू आहे, राजकीय नेत्यांच्या गर्दीसोबतच्या सभाही सुरू आहेत. मात्र उद्योग आणि काम आवश्यक नाही.” असं खोचक ट्विट त्यांनी केलं आहे. त्याच बरोबर ‘अत्यावश्यक सेवा म्हणजे नेमकं काय? प्रत्येकाला त्याचं काम आवश्यक असत’ असे देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे. चित्रपटांचे चित्रिकरण, आयपीएल सामने, राजकीय निवडणूक प्रचारसभा यांना सूट देण्यात आल्यामुळे त्यांनी उपरोधिक ट्विट केले आहे. त्यामुळे आता अंबानी कुटुंबातील नव्या पिढीतून लॉकडाऊनवर टीका झाल्यानं याबाबत जोरदार चर्चा सुरू होणं स्वाभाविकच आहे.
Professional ‘actors’ can continue shooting their films. Professional ‘cricketers’ can play their sport late into the night. Professional ‘politicians’ can continue their rallies with masses of people. But YOUR business or work is not ESSENTIAL. Still don’t get it?
— Anmol A Ambani (@anmol_ambani) April 5, 2021