Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली बाळासाहेबांच्या सल्ल्याची आठवण!

May 11, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Shivsena

मुक्तपीठ टीम

मशिदींवरील भोग्यांवरून मनसैनिकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, सत्ता येत-जात असते. सत्तेचा ताम्रपट कुणाच्याही हाती नसतो. उद्धव ठाकरे, तुमच्याही हातात नाही,” असं म्हणत मनसैनिकांवरील कारवायांचा निषेध नोंदवला. याच पार्श्वभूमीवर शिवसेने नेते अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सल्ल्याची आठवण करून देत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

सत्तेचा जाणून-बुजून वापर कुणी करत नाही…

  • पोलीस कारवाई होतच असते.
  • ज्याला आंदोलन करायचं असतं, त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या बाबतीत हे होत असतं.
  • त्यामुळे सत्तेचा जाणून-बुजून वापर कुणी करत नाही.
  • विरोधातल्या राजकीय पक्षांना या सगळ्या गोष्टींना सामाोरं जावं लागतं.
  • त्यामुळे सत्तेचा गैरवापर किंवा अंत पाहाणं हा विषय तसाही येत नाही.

आम्ही देखील यापूर्वी आंदोलनं केलीत!!

  • आम्ही देखील यापूर्वी आंदोलनं केली आहेत.
  • आमच्या घरात देखील रात्री-अपरात्री पोलीस येऊन आम्हाला घेऊन जायचे.
  • कधीकधी मारत मारत देखील घेऊन गेले आहेत.
  • आंदोलकाला या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं.
  • हा पोलीस आणि आंदोलकांचा विषय असतो.
  • यात सरकारचा काही विषय नसतो.
  • पोलीस शिवसेनेचं सरकार आहे म्हणून कारवाई करतात आणि काँग्रेस किंवा भाजपाच्या काळात करत नव्हते अशातला भाग नाही.
  • ते आंदोलकांना शोधायला कधीही जातात.
  • कुठल्याही प्रकारच्या आंदोलनात एखादा गुन्हा घडतो, तेव्हा पोलीस त्यांची कारवाई करत असतात.

बाळासाहेब सांगायचे, आंदोलन करत आहात तर दोन दिवस आतमध्ये जाण्याचीही तयारी ठेवा…

  • मनसेला आवाहन करणारा मी कोण आहे?
  • मी माझ्या पक्षाबद्दल बोलू शकतो.
  • बाळासाहेब नेहमी सांगायचे की आंदोलन करत आहात तर दोन दिवस आतमध्ये जाण्याचीही तयारी ठेवा.
  • ती तयारी ठेऊनच आम्ही आंदोलनं करायचो.
  • अशा बऱ्याच आंदोलनांच्या वेळी आम्ही आतमध्ये जाऊन आलो आहे.

Tags: Anil ParabMaharashtramnsRaj Thackerayअनिल परबबाळासाहेब ठाकरेभोंगा आंदोलनमनसेमहाराष्ट्रराज ठाकरे
Previous Post

ओएनजीसीत नॉन-एक्झिक्युटिव्ह पदाच्या ९२२ जागांवर महाभरती

Next Post

किल्ले उंदेरी… लोखंडी तोफगाड्यांचं दुर्गार्पण!

Next Post
किल्ले उंदेरी… लोखंडी तोफगाड्यांचं दुर्गार्पण!

किल्ले उंदेरी... लोखंडी तोफगाड्यांचं दुर्गार्पण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!