मुक्तपीठ टीम
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सध्या अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढतच आहेत. एकीकडे मुंबई पोलिसांचे बडतर्फ एएसआय सचिन वाझेने चांदीवाल आयोगासमोर एक प्रतिज्ञापत्र सादर केलं. या प्रतिज्ञापत्रात त्याने देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांच्या निर्देशानुसारच वाझेने बारमधून खंडणीची वसुली केली, असा आरोप त्याने केला आहे. वाझेने आपल्या आधीच्या जबानीचे खंडण करत हे आरोप केले आहेत. तर दुसरीकडे सीबीआयने आर्थर रोड कारागृहात असलेले देशमुख यांचे सहकारी संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचे जबाब नोंदवले.
वाझेचे देशमुखांवर गंभीर आरोप
- वाझे याने प्रतिज्ञापत्रात म्हटले की,त्यांनी आयोगाला याआधी दिलेले त्यांचे पूर्वीचे विधान मागे घेतले आहे.
- ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की, ‘देशमुख यांच्याकडून त्यांना बार आणि रेस्टॉरंटमधून पैशांची वसुली करण्यासाठी कोणत्याही सूचना आलेल्या नव्हत्या.
- अनिल देशमुख यांनी मला नेहमीच माझा गंभीर मानसिक छळ आणि मला त्रास दिला.
- या सगळ्या गोष्टी त्यांच्या राजीनाम्यानंतर देखील सुरूच होत्या.
- एवढेच नव्हे तर त्यांचे प्रतिनिधीही त्यांच्यावतीने त्याच गोष्टी माझ्यासोबत करत आहेत.’
- मुंबई गुन्हे शाखेने मला अटक केल्यानंतर माझ्यावर खूप दबाव होता आणि त्यामुळे मी पूर्ण १५ दिवसांची पोलीस कोठडी स्वीकारली.
- “पोलीस कोठडीच्या या कालावधीत, माझ्या मानसिकतेवर आणि माझ्या मानसिक स्थितीवर परिणाम व्हावा म्हणून माझा मानसिक छळ करण्यात आला.
- माझं आजही हेच म्हणणं आहे की, अनिल देशमुख यांच्यामुळे मी स्टॉकहोम सिंड्रोमने बाधित झालेला बळी आहे.
- ज्यांचे आजही माझ्यावर, माझे आयुष्यावर, माझ्या भविष्यावर आणि माझ्या सभोवतालच्या परिस्थितीवर प्रचंड प्रभुत्व आहे.
एक प्रकारचा दबाव आहे. - ‘याचं उदाहरण म्हणजे नवी मुंबई पोलिसांच्या एस्कॉर्ट पार्टीला बजावलेली कारणे दाखवा नोटीस ही पगारवाढ रोखण्यासाठी छळवणुकीची अशीच एक घटना आहे.’
- यापूर्वी चांदीवाल आयोगासमोर झालेल्या सुनावणीत सचिन वाझेने असं म्हटलं होतं की, अनिल देशमुख आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी यांनी कधीही आपल्याला पैसे गोळा करायला सांगितलं नव्हतं.
देशमुखांच्या सहकाऱ्यांची सीबीआयकडून चौकशी
- पालांडे यांनी देशमुखांचे स्वीय सचिव आणि शिंदे यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले आहे.
- पोलिस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखालील सीबीआयचे पथक सोमवारपासून या दोघांची चौकशी करत आहे आणि गुरुवारीही त्यांचे जबाब नोंदवतील, असे अधिकाऱ्याने सांगितले.
- पालांडे आणि शिंदे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती, जे देशमुख यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहेत.
- सध्या ते न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड कारागृहात आहे.