मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पीए आणि पीएस यांना अटक करण्यात आली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने ही कारवाई केली आहे. पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पालांडे अशी या दोघांची नावं आहेत. बार मालकांच्या जबाबानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईतून ईडीनं अनिल देशमुखांभोवतीचा फास अधिकच आवळण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
बार मालकाच्या जबाबानंतर कारवाई
• एकीकडे ईडीकडून अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी छापेमारी केली गेली.
• तर दुसरीकडे ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील काही बार मालकांचेही जबाब नोंदवल्याचं कळतंय.
• सुमारे १० ते १२ बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला आहे.
• त्यात या बार मालकांनी मिळून काही महिने ४ कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे.
• त्याच अनुषंगाने आता ईडीची कारवाई सुरु केली.
देशमुख यांच्या नागपूर, मुंबईतील घरांवर ईडीचा छापा
• शुक्रवारी अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या निवासस्थानासह मुंबईतल्या ज्ञानेश्वरी, सुखदा या निवासस्थानी ईडीच्या पथकाने छापेमारी केली.
• पीएसएलए कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
• अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील जीपीओ चौक परिसरातील निवासस्थानी तसंच संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी करण्यात आली.
ईडीकडून सातत्यानं चौकशी
• संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली.
• ईडीने देशमुख यांच्या घरातील प्रत्येक किल्ली मागवून अगदी एक एक ड्रॉवर तपासले.
• यावेळी सर्व कागदपत्रे तपासण्यात आली.
• ईडीच्या टीमने देशमुख यांची चौकशी केली नाही.
• सव्वा तीन तासाने ईडी टीम निघून गेली.
• तिथून देशमुख वरळीच्या घरी पोहोचले.
• वरळी आणि नागपूर इथे तपास पूर्ण झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी देशमुख कुटुंबियांचे जबाब घेतले.