मुक्तपीठ टीम
सध्या सर्वच महानगरांमध्ये रस्ते तसेच पदपथांचेही बांधकाम काँक्रिटने केले जाते. अशा बांधकामात अनेक ठिकाणी झाडांच्या मुळापर्यंत काँक्रिटीकरण करण्यात केले जात असते. त्यामुळे झाडांना पाणी मिळणं कठिण जातं. अनेकदा झाडे सुकतात. त्यांचे नाहक बळी जातात. २०१३पासून राष्ट्रीय हरित लवादानं सातत्यानं आदेश देऊनही स्थानिक स्वराज्य संस्था झाडांना सिमेंटच्या विळख्यातून सोडवत नाहीत. आता मात्र पुण्यात काही ठिकाणी अंघोळीची गोळी या संस्थेचे प्रमुख माधव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमधून झाडांभोवती आळी सोडली जात आहे. याविषयी थेट माहिती देत आहेत माधव पाटील आणि सहकारी…
#आळेयुक्तझाडे
आमच्यासारख्या वेड्यांच्या रेट्यामुळे का होईना @pcmcindiagovin ने
झाडाजवळ पावसाचे पाणी मुरवण्याची सोय केली.कौतुक तर केलेच पाहिजे.
धन्यवाद. @rajeshpatilias सर.
आपली,
झाडांना सन्मान देणारी #अंघोळीचीगोळी.
सन्मान म्हणजे #हवामानठोसा , तो दिलाच पाहिजे.#म #खिळेमुक्तझाडं pic.twitter.com/8BhozYTJgn— अंघोळीची गोळी #BathPill- Skip a Bath (@AngholichiGoli) September 21, 2021
झाडांचे पाणी अडतं…मरण ओढवतं!
- सध्या सर्वच महानगरांमध्ये रस्ते तसेच पदपथांचेही बांधकाम काँक्रिटने केले जाते.
- अशा बांधकामात अनेक ठिकाणी झाडांच्या मुळापर्यंत काँक्रिटीकरण करण्यात केले जात असते.
- काही ठिकाणी व्यापारी व दुकानदारही दुकानांबाहेरच्या पदपथांवरील झाडांना सुशोभिकरणासाठी सिमेंटचे कठडे बांधत असल्याने झाडांच्या मुळापर्यंत पाणी पोहचत नाही.
- त्यामुळे झाडांना पुरेसा पाणी पुरवठा होता नसल्याने झाडे मरत असतात.
- त्यामुळे पर्यावरणवादी अनेकदा आवाज उठवतात.
- असे कठडे काढून टाकावेत, असे आदेश हरित लवादाने दिले आहेत.
- मात्र, क्वचितच त्यानुसार झाडांना मोकळं केलं जातं.