Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

अंगणवाडी सेविकांचा सरकारविरोधी एल्गार! ‘अप’मानधन नको, हक्काचं वेतन द्या! न्याय द्या सरकार!

August 29, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Aganwadi sevika

अपेक्षा सकपाळ

अंगणवाडी सेविकांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. यासंबंधित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीने निवेदन जारी केले आहे. महाराष्ट्रातील नव्या शिंदे-फडणवीस सरकारने अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्याची विनंती देखील या निवेदनातून करण्यात आली आहे. यासाठी कृति समितीच्या पदाधिकाऱ्यांना भेटीची वेळ देण्यात यावी अशी मागणी केली आहे. परंतु जर अशा प्रकारची चर्चा झाली नाही तर सर्व जिल्हा परिषदांवर मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देखील यातून देण्यात आला आहे.

पाहा अंगणवाडी सेविकांना न्यायासाठी चर्चेचा व्हिडीओ

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मागणीपत्र जसं आहे तसं…

प्रति,
मा. सचिव,
महिला व बालविकास विभाग,
महाराष्ट्र शासन, मुंबई

मा. आयुक्त, एबाविसे योजना, महाराष्ट्र राज्य, रायगड भवन, नवी मुंबई

विषय- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत वेळ देणेबाबत…
•मागण्या मान्य न झाल्यास , दि . १२.९ .२०२२ पासून जिल्हा परिषदांवर मोर्चे व दि . २०.९ .२०२२ रोजी, मंत्रालयावर मोर्चा

महोदय, आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समिती तर्फे खालीलप्रमाणे निवेदन करीत आहोत.
महाराष्ट्रातील नव्या सरकारसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे आम्ही आपल्याला निवेदन सादर करीत आहोत. पोषण, शिक्षण व आरोग्य क्षेत्रांत महत्वाची जबाबदारी पार पाडत असलेल्या व कोरोना लॉकडाउनच्या काळातही अविरतपणे लाभार्थींना सेवा देणा – या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून त्या मान्य कराल, अशी आशा आहे.

१. अंगणवाडी सेविका / मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिस या शासनाच्या कर्मचारी आहेत , शासन त्यांचे मालक आहे, एकात्मिक बालविकास सेवा योजना ही आस्थापना आहे, अंगणवाडी कर्मचा यांचे कामाचे स्वरूप पहाता, ते अर्धवेळ नसून पूर्णवेळ काम आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्याला मानधन म्हणता येणार नाही, तर ते वेतन आहे, असा निर्णय मा. सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटीशन क्रमांक ३१५३/२०२२ मध्ये दिले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नेमणूक संविधानाच्या शिक्षण , आहार व पोषणविषय इ. घटनात्मक तरतूदींची अंमलबजावणी करण्याकरीता करण्यात आली आहे . एकात्मिक बालविकास सेवा योजनेसारख्या तात्पुरत्या योजनेचा अंगणवाडी कर्मचारी भाग नाहीत . तर अंगणवाडी कर्मचा – यांची पदे ही कायदयाने निर्माण केलेली पदे (statutory post) आहेत . बहुसंख्य अंगणवाडी कर्मचारी वर्षानुवर्षे सलग कार्यरत आहे . या सर्व बाबींना विचार करता अंगणवाडी कर्मचारी या शासकीय कर्मचारी आहेत . म्हणून त्यांना शासकीय वेतनश्रेणी , भत्ते , सेवासमाप्ती लाभ पूर्वलक्षीप्रभावाने देण्यात यावेत . याची अम्मलबजावणी होईपर्यंत अंगणवाडी कर्मचा यांना सध्या मिळत असलेल्या वेतनांत १२००० रूपयांची अंतरिम वेतनवाढ देण्यात यावी .

२. दि . १८.६.२०२२ रोजी , मा . मंत्री , महिला व बालविकास विभाग यांच्या निवासस्थानी मा . आयुक्त , एबाविसे योजना यांच्या उपस्थितीत अंगणवाडी कर्मचा – यांच्या मानधनवाढ व पेन्शन देण्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली होती . चर्चेअंती अंगणवाडी कर्मचा – यांना मानधनवाढ व दरमहा अर्ध्या मानधनाएवढी पेन्शन देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला सादर करण्याचे ठरले होते . या प्रस्तावास विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनांत ताबडतोब मान्यता घेऊन विनाविलंब त्याची अम्मलबजावणी करण्यात यावी .

३. मा . सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटीशन क्रमांक ३१५३/२०२२ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार , देशांतील अंगणवाडी कर्मचारी पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी अॅक्ट नुसार ग्रॅच्युईटी मिळण्यास पात्र आहेत . म्हणून यापूर्वी सेवानिवृत्त / राजीनामा / मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचा – यांना ग्रॅच्युईटी देण्यात यावी .

४. सध्या दिलेले मोबाईल हे कालबाह्य झाले आहेत . म्हणून महाराष्ट्र सरकारने मोबाईल / टॅब देण्याकरीता १०० कोटी रूपयांची तरतूद अंदाज पत्रकीय अधिवेशनांत केली आहे . त्यालाही चार महिने झाले . अंगणवाडयांचे कामकाज व्यवस्थित होण्यासाठी नविन मोबाईल / टॅब देण्यांत यावेत . टॅब दिल्यास त्यावर कामकाज करणे अधिक सोयीचे जाईल .
५. मा . मुंबई उच्च न्यायालयाच्या रिट पिटीशन क्र . ३८५४/२०२१ मध्ये दिलेल्या आदेशाप्रमाणे राज्यांतील अंगणवाडी सेविकांना तिन महिन्यांच्या आत मराठी भाषेत पोषण ट्रॅकर ॲप देण्याची व्यवस्था करावी व तोपर्यंत अंगणवाडी सेविकांना वैयक्तिक मोबाईलमध्ये इंग्रजी भाषेत पोषण ट्रॅकर अॅप मध्ये माहिती भरण्याची सक्ती करू नये .
६. मोबाईलवर काम करण्यासाठी सेविका व मदतनिसांना देण्यात येणारा रू . ५०० व रू . २५० प्रोत्साहन भत्ता मिळण्यामध्ये प्रचंड अनियमितता आहे . सेविका काम करत असूनही त्यांना योग्य रक्कम मिळत नाही . परंतु त्यांच्या मदतनिसांना मिळते , अशी देखील उदाहरणे आहेत . तरी त्यात सुधारणा करून यापुढे मोबाईलचे वाढलेले काम पहाता प्रोत्साहनपर राशी मध्ये रू . २००० व रू . १००० ची वाढ करण्यात यावी .

७. मिनी अंगणवाडी सेविकांना मदतनिस नसल्याकारणाने अंगणवाडी केंद्रातील सर्व कामे एकटीलाच करावी लागतात . त्यांना सुट्टयांचाही लाभ मिळत नाही . तरी सर्व मिनी अंगणवाडयांचे रूपांतरण पूर्ण अंगणवाडयांमध्ये करण्यात यावे व मिनी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविकांएवढे मानधन , पदोन्नती उन्हाळी व दिवाळी रजा , परिवर्तन निधी व अंगणवाडी केंद्र बांधून देण्यात यावे .

८. दि . १७१.२०२० च्या महिला व विभागाच्या शासन निर्णयानुसार , नागरी , ग्रामिण व आदीवासी क्षेत्रांतील अंगणवाडी केंद्र इमारत भाडेवाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत . पण नगरपालिका व महानगरपालिकेत त्याची अम्मलबजावणी केली जात नाही . शासन आदेशामध्ये असलेल्या अटी शिथील करण्यात याव्या व महानगर / नगरपालिका क्षेत्रांतील अंगणवाडी केंद्राच्या परिस्थितीनुसार इमारत भाडेवाढ देण्यात यावी .

९ . दरवर्षी सुमारे २३०० अंगणवाडी कर्मचारी सेवानिवृत्त होतात . सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या अंगणवाडी केंद्राना अतिरिक्त भार शेजारच्या गावांतील सेविकांना देण्यात येतो . एकाच वेळी एका अंगणवाडी कर्मचारीकडून दोन अंगणवाडी केंद्राचे काम करणे शक्य नसल्याकारणाने अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना योजनेच्या सेवेचे फायदे वेळेवर मिळत नाहीत . आमच्या माहितीप्रमाणे सध्या १० ९ ७४२ अंगणवाडयांमध्ये १०५७०० सेविका व ९ ७४७५ मदतनिस कार्यरत असून उर्वरीत जागा रिक्त आहेत . त्याचप्रमाणे मुख्यसेविका / पर्यवेक्षिका १/३ व प्रकल्प अधिका – यांच्या १/२ पदे रिक्त आहेत . योजनेचे फायदे मिळण्याकरीता विनाविलंब रिक्त पदे भरण्यात यावी .

१०. राज्यात सुमारे ४५०० सेवासमाप्त करण्यात आलेल्या अंगणवाडी कर्मचा – यांना सेवासमाप्तीनंतर देण्यात येणारा एकरकमी लाभ मिळालेला नाही . त्यापैकी सुमारे १२०० अंगणवाडी कर्मचारी मृत्यू पावले आहेत . दि . २ ९ .३.२०२२ रोजी महिला व बालविकास विभागाने सेवासमाप्ती लाभाकरीता १०० कोटीचा निधी मंजूर करून भारतीय जीवन विमा निगम शाखा पुणे कडे दिला आहे . ४ महिने उलटून सुध्दा सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचा – यांना व मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचा – यांच्या वारसांना एकरकमी लाभाची रक्कम मिळालेली नाही . ही रक्कम संबंधीत कर्मचा – यांना विनाविलंब देण्यात यावी .

११. महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्र . एबावि २००१ / प्र.क्र .१४६ / कार्या .६ , दि . २.१.२००२ च्या शासन निर्णयानुसार , एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पर्यवेक्षिकांच्या एकूण मंजूर पदांपैकी ५० टक्के पदे उत्तीर्ण असलेल्या व १० वर्षे मानधनी सेवा झालेल्या सेविकांमधून भरण्यास मान्यता देण्यात आली आहे . वरील शासन निर्णयानुसार एबाविसे योजनेत पर्यवेक्षिकांची जी पदे रिक्त आहेत ती पदे विनाविलंब पात्र अंगणवाडी सेविकांमधून भरण्यात यावीत . पद भरताना अंगणवाडी सेविकांचे वय व शिक्षणात कोणताही बदल करण्यात येवू नये .

१२. आदीवासी , दुर्गम व अतिदुर्गम प्रकल्पाच्या कर्मचा – यांना दि . ९ .११.१ ९९ ३ च्या शासकीय निर्णयानुसार , अंगणवाडी सेविका / मदतनिसांना अनुक्रमे प्रत्येकी १०० रू . व ७५ रु . दरमहा अतिरिक्त प्रोत्साहनपर मानधन देण्यात येत होते . याशिवाय नवसंजीवनीच्या अधिक कामाने सेविका / मदतनिसांना अनुक्रमे १०० रु . व ७५ रू . देण्यात येत होते . जून २०१७ पासून पीएफएमएस प्रणाली द्वारे मानधन लागू केल्यानंतर जव्हार , मोखाडा , डहाणू , तलासरी , कासा , पेठ , कळवण , सुरगाणा , तळोदा , अक्कलकुवा , किनवट , धारणी , निखलदरा , अहेरी , सिरांचा , भामरागड , ● एटापल्ली , गडचिरोली , धानोरा व कुरखेडा प्रकल्पांतील अंगणवाडी कर्मचा – यांना वरील मानधन Adivate Windows मिळालेले नाही . संबंधीत प्रकल्पांतील अंगणवाडी कर्मचा – यांना पूर्वलक्षीप्रभावाने अतिरिक्त प्रोत्साहनपर 9s to activate Windows मानधन देण्यात यावे .

१३. दि . १ ९.९ .२००१ रोजीच्या शासन निर्णयानुसार , अंगणवाडी सेविका / मदतनिसांचा प्रवासभत्ता वेळेवर अदा करण्याबाबत आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत . माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार राज्यांतील काही प्रकल्पातील काही बिटातील अंगणवाडी सेविका / मदतनिसांना २०१३ पासून टीएडीएची रक्कम मिळालेली नाही . जिल्हानिहाय थकित टीएडीएीची माहिती घेऊन अंगणवाडी कर्मचा – यांना थकित टीएडीएची रक्कम देण्यात यावी व यापुढे सेविका / मदतनिसांना देण्यात येणा – या दरमहा मानधनामध्ये टीएडीएची रक्कम देण्याची व्यवस्था करण्यात यावी .

१४. केंद्र शासनाने सेविकांना ५ व १० वर्षे सेवेनंतर दिलेली रू . ३१ व रू . ६३ अशी वाढ महाराष्ट्र शासनाने जून २०१७ पासून देणे बंद केले आहे . केंद्र शासनाने केलेली वाढ पूर्वलक्षीप्रभावाने अंगणवाडी सेविकांना देण्यात यावी .

१५. महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्र . एबावि / २०१७ / प्र.क्र .१०३ / कार्या .६ , दि . २३.२.२०१ ९ ८ च्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका / मदतनिस व मिनी सेविकांना सेवाजेष्ठतेआधारे निश्चित केलेल्या ११ ते २० वर्षे , २१ ते ३० वर्षे व ३१ वर्षावरील सेवाकाळावधी प्रमाणे अनुक्रमे ३ , ४ व ५ टक्के अनुज्ञेय मानधनवाढ ऑक्टोबर २०१७ पासून लागू करण्यात आली आहे . काही अंगणवाडी कर्मचा – यांना सेवाकाळाप्रमाणे वरील मानधनवाढ मिळत नाही . ही मानधनवाढ अंगणवाडी कर्मचा – यांना पूर्वलक्षीप्रभावाने देण्यात यावी .

१६ एबावि / २०१७ / प्र.क्र .१०३ / कार्या .६ , दि . २३.२.२०१ ९ ८ च्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका / मदतनिस व मिनी सेविकांना सेवाजेष्ठतेआधारे निश्चित केलेल्या ११ ते २० वर्षे , २१ ते ३० वर्षे व ३१ वर्षावरील सेवाकाळावधी प्रमाणे अनुक्रमे ३ , ४ व ५ टक्के अनुज्ञेय मानधनवाढ ऑक्टोबर २०१७ पासून लागू करण्यात आली आहे . काही अंगणवाडी कर्मचा – यांना सेवाकाळाप्रमाणे वरील मानधनवाढ मिळत नाही . ही मानधनवाढ अंगणवाडी कर्मचा – यांना पूर्वलक्षीप्रभावाने देण्यात यावी . १६. एबावि / कार्या . १ / आस्था / ५४०४१ संचालनालय दि . २२.२.१ ९ ८८ च्या परिपत्रकानुसार अंगणवाडी कार्यकर्तीना जादा पदभार सांभाळण्याकरीता अतिरीक्त मेहेनताना ( मानधन ) रू . ५० दरमहा अदा करण्याबाबतचे आदेश असून सुध्दा अंगणवाडी कर्मचा – यांना अतिरीक्त अंगणवाडी केंद्राच्या कामाचे मानधन मिळत नाही . ज्या अंगणवाडी कर्मचा – यांना अतिरीक्त अंगणवाडी केंद्राचे काम देण्यात आले आहे त्यांना पूर्वलक्षीप्रभावाने अतिरिक्त मेहेनतानाचे मानधन देण्यात यावे व त्यांच्या मेहेनताना मध्ये सेविकांच्या मानधनाच्या ५० टक्के रक्कम देण्यात यावी व यापुढे अंगणवाडी कर्मचा – यांना अतिरिक्त अंगणवाडी केंद्राने काम देण्यात येवू नये .

१७. जा.क्र . एबाविसेयो / नवी मुंबई / कार्या . ७ / अंगणवाडी / उन्हाळी सुट्टी / २०२२-२३ / १६ ९९ , दि . २ ९ .४.२०२२ च्या परिपत्रकानुसार , अंगणवाडी कर्मचा – यांना २०२१-२२ व २०२२-२३ या वित्तीय वर्षातील उर्वरीत कालावधीनी उन्हाळी सुट्टी मंजूरीबाबत स्वतंत्र सुचना निर्गमीत करण्याबाबत कळविण्यात आले होते . पुढील महिन्यापासून महाराष्ट्रात मोठे सण सुरू होत असताना अंगणवाडी कर्मचा – यांना २०२१-२२ ची १६ दिवसांची उन्हाळी रजा व २०२२-२३ नी ९ दिवसांची उर्वरीत रजा देण्याबाबतचे परिपत्रक निर्गमीत करण्यात यावे .

१८. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महागाईचा विचार करता गणवेशाकरीता देण्यात येत असलेले प्रत्येकी ८०० रू . मध्ये वाढ करून प्रत्येकी १६०० रू . करण्यात यावे . तसेच अंगणवाडी कर्मचा – यांना २०२१-२२ मध्ये गणवेश देण्यात आले आहेत परंतु २०२०-२१ या आर्थिक वर्षाने गणवेश दिले नाहीत . अंगणवाडी कर्मना – यांनी स्वतःने पैसे खर्च करून गणवेश खरेदी केले आहेत . म्हणून त्यांना e Windows २०२०-२१ न्या गणवेशाना निधी देण्यात यावा .

१९ अंगणवाडयांसाठी लागणारे अतिआवश्यक रजिस्टर व वर्षभराकरीता लागणा – या अन्य साहित्यांसाठी सध्या २००० रू . परिवर्तन निधी देण्यात येतो . मा . सचिव , महिला व बालविकास यांच्यासोबत दि . २३.२.२०२२ रोजी झालेल्या चर्चेत मा . प्रधान सचिवांनी रू . ५००० परिवर्तन निधी देण्याचे मान्य केले होते . त्याची अम्मलबजावणी विनाविलंब करण्यात यावी .

२०. महाराष्ट्रात कुपोषण वाढत आहे . शिवाय आता कुणीही खात नसलेला टीएचआर पुन्हा सुरू करणार असल्याचे समजते . त्यामुळे कुपोषण अजूनच वाढेल . तरी आहार पुरवठयात सुधारणा करा .. ताज्या शिजवलेल्या आहराचा पुरवठा करण्याचे काम स्थानिक महिला बचतगटांना द्या व वाढलेल्या महागाईनुसार त्याचा दर सामान्य बालकांसाठी १६ रू . व अतिकुपोषित बालके व गरोदर , स्तनदा मातांसाठी ३२ रू . असा दर द्या . आहाराचे कोणत्याही प्रकारे केंद्रीकरण करू नये . मदतनिसांना आहार शिजवण्याची जबाबदारी दिली असल्यास इंधन सातत्याने महाग होत आहे व अंगणवाडी सुरू होण्याआधी आहार शिजवावा लागतो व अंगणवाडीच्या नियमीत वेळेपेक्षा जास्त वेळ द्यावा लागतो . त्यामुळे त्यांना इंधन व करणावळापोटी दरडोई दररोज ३ रू . प्रति लाभार्थी प्रमाणे दर देण्यात यावा . आहाराचा कच्चा माल देताना तो शिजवण्यायोग्य चांगल्या दर्जाचा व स्वच्छ असावा . त्याचे दळण , भरडा करणे याची जबाबदारी सेविका किंवा मदतनिसांवर टाकू नये . आहाराचे अनुदान दर महिन्याला नियमीतपणे द्यावे किंवा कोरडा शिक्षा अंगणवाडीत दर महिन्याला पोच करावा .

२१. ग्रामिण प्रकल्पांतील बहुसंख्य अंगणवाडी सेविकांकडे आहार शिजवण्याकरीता लागणारी भांडी , सिलेंडर व शेगडया उपलब्ध नसल्यामुळे विनालिवंब त्यांना त्याचा पुरवठा करण्यात यावा . तसेन नगरपरिषद अंतर्गत असलेल्या अंगणवाडी केंद्रात सुध्दा आहार शिजवण्याकरीता भांडी , सिलेंडर व शेगडया उपलब्ध करून देण्याची सुचना देण्यात यावी .

२२. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांकरीता बेबी केअर किट , दुध पावडर व इतर साहित्य प्रकल्प कार्यालयात पोच करण्यात येते . प्रकल्प अधिकारींच्या सुचनेप्रमाणे अंगणवाडी सेविकांना ते साहित्य प्रकल्प कार्यालयातून खेडयापाडयाच्या गावांत केंद्रापर्यंत स्वतःचे पैसे खर्च करून घेऊन जावे लागते . त्याकरीता प्रकल्प , जिल्हा किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून अंगणवाडी सेविकांना कोणताही निधी उपलब्ध करून देण्यात येत नाही . अंगणवाडी कर्मचा – यांची मागणी आहे की , टीएचआर प्रमाणे लाभार्थीचे साहित्य अंगणवाडी केंद्रात पोच करण्यात यावे .

२३. अंगणवाडी कर्मचारी अल्प मानधनावर काम करणारे कर्मचारी आहेत . त्यांच्या जगण्याचे एकमात्र साधन अंगणवाडीची नोकरी आहे . वेळेवर मानधन न मिळाल्यामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते . त्यांना दरमहा वेळेवर मानधन देण्यात यावे .

२४. ज्या अंगणवाडी कर्मचा – यांचे बँक खाते महाराष्ट्र बँकेत आहे त्यापैकी सुमारे ४०० ते ५०० अंगणवाडी कर्मचा – यांच्या खात्यातून परत गेलेले पैसे अजून त्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत . तसेच नोव्हेंबर २०२१ पासून संबंधीत अंगणवाडी कर्मचा – यांना कमी मानधन मिळाले आहे . अंगणवाडी कर्मचा – यांची मागणी आहे की , महाराष्ट्र बँकेतून परत गेलेले पैसे त्यांच्या खात्यात जमा करून दरमहा पूर्ण मानधन त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे .

२५. ज्या अंगणवाडी कर्मचा – यांचे मानधन पीएफएमएस प्रणाली द्वारे होत नाही , त्या कर्मचा – यांना ४ ते ५ महिने मानधनाकरीता वाट पहावी लागते . मानधन न मिळाल्याकारणाने अंगणवाडी कर्मचा – यांची उपासमार होते . अशा कर्मचा – यांना दरमहा ऑफलाईन पध्दतीने मानधन देण्यात यावे व त्यांना पीएफएमएस प्रणाली द्वारे मानधन मिळेल अशी करवाई करण्यात यावी .

२६. अंगणवाडी कर्मचा – यांना त्यांच्या सेवाकाळात त्यांच्या मागणीनुसार एकदा बदली देण्याचे नियम तयार करण्यात यावे .

२७. नव्याने विकसीत होणा – या शहरांमध्ये लोकसंख्या झपाटयाने वाढत असल्यामुळे अशा शहरांमध्ये प्रत्येकी ८०० ते १००० लोकसंख्येला १ अंगणवाडी हे प्रमाण कायम ठेवावे व ज्या अंगणवाडी क्षेत्रातील लोकसंख्येत वाढ झाली आहे तिथे नविन अंगणवाडी केंद्र उघडण्यात यावे .

२८. आदीवासी क्षेत्रातील गरोदर , स्तनदा व ३ ते ६ वयोगटातील लाभार्थीना डॉ.एपीजे अब्दुल कलाम आहार योजनेंतर्गत एकवेळचे जेवण व अंडी केळी वाटप करण्यात येते . २०१८ साली अमृत आहाराचे दर ३५ रू . करण्यात आले होते . २०१८ नंतर सर्व जिवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याकारणाने अमृत आहाराच्या दरात वाढ करण्यात यावी

२९ . ज्या मदतनिसांना व बालवाडी सेविकांना अंगणवाडी सेविकांना म्हणून थेट नियुक्ती देण्यात आली आहे त्या कर्मचा – यांची मागनी सेवा ग्राह्य धरून सेवेचे फायदे देण्यात यावे .
३०. क्र . एबाविसेयों / अंगणवाडी / कार्या . ७ / सेम माहिती / २०१८-१९ / २५४१ , दि . ७.७.२०१८ रोजीच्या आयुक्त कार्यालयाच्या सुचनेनुसार , अंगणवाडी सेविका / मिनी अंगणवाडी सेविका / मदतनिस यांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व अंगणवाडी कार्यकर्ती विमा योजनेंतर्गत लाभ घेण्याबाबत तात्काळ माहिती सादर करण्याकरीता प्रकल्प कार्यालयांना कळविण्यात आले होते . बहुसंख्य प्रकल्प कार्यालयांनी यानी अम्मलबजावणी न केल्याकारणाने जर अंगणवाडी कर्मचारी मृत्यू पावले किंवा कॅन्सरसारख्या आजार उदभवले तर त्या कर्मचा – यांना या विमा योजनेने लाभ मिळत नाहीत . आम्ही मागणी करीत आहोत की , राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मना – याने विमा शासनाकडून उतरवण्यात यावे व त्याने लाभ कर्मचा – यांना देण्यात यावे .
३१. अंगणवाडी सेविकांना आजन्या दरानुसार सिम रिचार्जना आगाउ निधी देण्यात यावा . सध्या ८४ दिवसांकरीता ७२० रू . सिम रिचार्जकरीता सांवकांना खर्च करावे लागतात .

३२. एकात्मिक बालविकास सेवा योजनेने खाजगीकरण करण्यात येवू नये .

३३. पूर्व प्राथमिक शिक्षण ही बाब प्राधान्याने अंगणवाडयांकडे सोपवावी व त्यांचे खाजगीकरण व व्यवसायीकरणाला कोणत्याही स्वरूपात प्रोत्साहन देण्यात येवू नये .

३४. महानगरपालिका क्षेत्रांत मदतनिसांच्या थेट नियुक्तीकरीता घालण्यात आलेली वॉर्डाची अट काढण्यात यावी व प्रकल्पात कार्यरत मदतनिसांना सेवाजेष्ठतेच्या आधारे सेविकापढ़ी थेट नियुक्ती देण्यात यावी.

वरील मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी कृति समितीच्या पदाधिकाऱ्यांना भेटीची वेळ देण्यात यावी व मागण्या सहानुभूतीने व समाधानकारकरित्या सोडवाव्या अशी आम्ही विनंती करीत आहोत . परंतु जर अशा प्रकारची भेट होऊन चर्चा झाली नाही तर दि . १२.९ .२०२२ पासून सर्व जिल्हा परिषदांवर व दि . २०.९ .२०२२ रोजी , मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल , याची कृपया नोंद घ्यावी .


Tags: Aganwadi SevikaMaharashtraअंगणवाडी सेविकामहाराष्ट्रशिंदे-फडणवीस सरकार
Previous Post

सामना अग्रलेख : महाराष्ट्र लढत राहिला व जिंकला! शिवसेना – संभाजी ब्रिगेडही लढणार आणि जिंकणार!!

Next Post

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस लवकरच आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावणार, वर्क फ्रॉम होम बंद करणार!

Next Post
Tata Consultancy Service

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस लवकरच आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावणार, वर्क फ्रॉम होम बंद करणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!