Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंधेरीचे आमदार रमेश लटके यांचं अकाली निधन! शिवसेनेनं गमावला मोलाचा शिलेदार…

May 12, 2022
in featured, घडलं-बिघडलं, प्रेरणा
0
shivsena mla ramesh latke death

मुक्तपीठ टीम

मुंबईतील अंधेरी मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. प्रथमच कुटुंबासह परदेश पर्यटनासाठी गेलेल्या आमदार लटके यांचं दुबईत निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी या लोकप्रिय आमदाराने अखेरचा श्वास घेतल्याने अंधेरीच नाही तर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चौफेर घेरले जात असताना शिवसेनेने एक महत्वाचा शिलेदार गमावला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार रमेश लटके यांचे पार्थिव उद्या संध्याकाळी दुबईहून मुंबईत आणले जाणार आहे.

 

सामान्य कुटुंबात जन्म…समाजसेवेत मग्न!

  • आमदार रमेश लटके हे मूळ कोल्हापुरातील शाहुवाडीचे.
  • त्यांचे कुटुंब अंधेरी पूर्व परिसरातील वांच्छा सिद्धिविनायक मंदिर परिसरात राहत असे.
  • अतिशय सामान्य परिस्थितीत जन्माला आलेल्या रमेश लटके यांनी व्हिडीओ कॅसेटचा व्यवसाय केला.
  • व्यवसायात जम बसवत असतानाच ते सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले.
  • ते शिवसेनेच्या माध्यमातून अंधेरी पूर्व भागातील पंपहाऊस परिसरात सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत झाले.
  • पंपहाऊसमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सूत्रधार झाले.
  • त्या गणेशोत्सवास त्यांनी भव्य स्वरुप प्राप्त करुन दिले.

 

शिवसेना शाखाप्रमुख ते प्रतिकुलतेवरही आमदार!

  • शिवसेनेने त्यांना शाखाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली.
  • आमदार रमेश लटके हे १९९७ साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले.
  • त्यानंतरही पुढच्या दोन निवडणुकांमध्ये सन २००२ आणि २००९ मध्येही ते महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले.
  • भाजपाने अचानक साथ सोडल्यानंतर शिवसेनेने एकाकी लढवलेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार झाले.
  • त्यावेळी भाजपाप्रमाणेच तत्कालीन काँग्रेस आमदार आणि मंत्री सुरेश शेट्टी यांना रमेश लटके यांनी अस्मान दाखवले होते.
  • पुढच्या २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा नेते मुरजी पटेल यांनी बंडखोरी करून आव्हान उभे केले
  • मूळ काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या, पण राज्यातील बड्या भाजपा नेत्यांच्या आशीर्वादाने बंडखोरी केलेल्या मूरजी पटेल या सर्वसंपन्न बलशाली बड्या उमेदवाराला धूळ चाटत ते पुन्हा आमदार झाले.
  • त्याचे कारण अंधेरी पूर्वच्या मतदारांचा त्यांच्यावर असलेला विश्वास मानले जाते.
  • त्या निवडणुकीत दबाव असतानाही आमदार रमेश लटके यांना मुरजी पटेलच्या बंडखोरीविरोधात साथ देणाऱ्या भाजपाचे सुनील यादव यांचंही ऐन तारुण्यात काही दिवसांपूर्वी निधन झाले.
  • अंधेरीतील दोन नेत्यांचे अकाली निधन स्थानिकांना धक्का देणारे ठरले आहे.

 


Tags: Andherimlaramesh latkeShivsenaShivsena mla ramesh latkeअंधेरीरमेश लटकेशिवसेनाशिवसेना आमदार रमेश लटके
Previous Post

पांडवकडा धबधबा पर्यटन विकासाबरोबरच आदिवासी मुलांमधील टॅलेंट हंट ते नर्चरिंगसाठी प्रयत्न!

Next Post

पुस्तकाच्या गावानंतर साताऱ्यात मधाचं गाव! महाबळेश्वरच्या मांघरला मिळाला बहुमान!!

Next Post
Satara

पुस्तकाच्या गावानंतर साताऱ्यात मधाचं गाव! महाबळेश्वरच्या मांघरला मिळाला बहुमान!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!