Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

आहे ती परिस्थिती, मिळेल ती साधनं…जुगाड शोधांचे उद्योगपतीही फॅन!

July 11, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Viral Videos OF Jugaad

मुक्तपीठ टीम

जुगाड…एक असा शब्द जो भारतासाठी अतुलनीयच आहे. अनेकांना आवडत नाही. दर्जाशी तडजोड वाटते. पण प्रत्यक्षात आहे त्या साधनांमध्ये, परिस्थितीनुसार समस्या सोडवतो तो जुगाडचा शोधच! त्यामुळेच उद्योगपती आनंद महिंद्रांपासून अनेक मान्यवरही जुगाडचे कौतुकच करतात.

पूर्वी जुगाड म्हटलं की अनेकजण हेटाळणी करायचे. आता मात्र उद्योगपती आनंद महिंद्रा अशा अनेक उपयोगी जुगाडचं कौतुक करतात. तेही ट्विटरवर जाहीर असं. नुकताच त्यांनी एक व्यक्तीचा व्हिडीओ ट्विट करत लिहिलं, गुडघ्यापर्यंत साचलेल्या पाण्यात चालण्यासाठी एक आश्चर्यकारक शोध!

भारतातीय उद्योजकांमध्ये नामवंत असलेले आनंद महिंद्रा नेहमीच चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या गाड्यांमुळे तर कधी भावूक स्वभावामुळे ते चर्चेचा विषय ठरतात. आनंद महिंद्राची उदारता ही त्यांच्या पोस्टवरूनच समजते. ते नेहमीच नवनवीन व्हिडीओ शेअर करून व्हायरल करत असतात. असाच एक व्हिडीओ त्यांनी आजही शेअर केला आहे. आता सर्वचजण काही सोपं करण्यासाठी ‘जुगाड’ वापरण्यात पटाईत झाले आहेत. काही लोक त्यांच्या जुगाडाने प्रत्येक समस्येवर उपाय शोधतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला आहे.

 

👍🏽 As the saying goes: Necessity is the mother of invention… pic.twitter.com/VjyD2LzgAR

— anand mahindra (@anandmahindra) July 8, 2022

गरज ही शोधाची जननी आहे

आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओसोबत एक सुंदर संदेशही लिहिला आहे. ते म्हणतात की एक जुनी म्हण आहे, ‘गरज ही शोधाची जननी असते’.

व्हायरल झालेल्या व्हिडीओ पोस्टमध्ये काय आहे?

  • आनंद महिंद्रांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये, एक तरुण गुडघाभर पाणी साचलेला भाग पार करण्यासाठी दोन प्लास्टिकच्या स्टूलसह एक अनोखा जुगाड करतो.
  • त्याला पाण्यात उतरावे लागू नये म्हणून या तरुणाने स्टूलला दोरी बांधली आहे, ज्याच्या मदतीने तो एक स्टूल उचलतो आणि पुढे करतो, नंतर दुसरा स्टूल करतो आणि अशा प्रकारे तो स्टूलच्या सहाय्याने चालतो. स्टूल आणि पाण्याने भरलेला रस्ता ओलांडतो.
  • हा व्हिडीओ पाहून तो पूर्व भारतातील कुठल्यातरी भागातील असल्याचे दिसते. सध्या आसाम आणि ईशान्येतील इतर राज्यांमध्ये भीषण पूरस्थिती आहे. अशा परिस्थितीत हा व्हिडिओ त्या भागातील असल्याची शक्यता आहे.

आनंद महिंद्रा यांचा हा व्हिडिओ रिट्विट करून अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • राज कुमार नावाचा यूजर म्हणाला, भारत असाच एक अतरंगी देश आहे, सर, जग त्यांच्या जुगाडासमोर नतमस्तक होते.
  • सुशांत संत्रा नावाच्या यूजरने सांगितले, सोपे आणि प्रभावी उपाय. ‘जुगाडू’ विचार करणारे भारतीय खूप चांगले आहेत.
  • एक यूजर म्हणाला, “उत्तम कल्पना” पण मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हे दोन स्टूल वाहून नेणे अशक्य आहे, त्यासाठी काहीतरी नवीन विचार करण्याची गरज आहे.
  • हा एकमेव व्हायरल झालेला जुगाड नाही. याआधीही काही जुगाड नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यातील एक भन्नाटच.

चौथ्या मजल्यावरून थेट जमिनीवर!

एक भन्नाट जुगाड एका व्हायरल क्लिपमध्ये आपण पाहू शकतो. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून एक मोठा मजबूत कापड जमिनीवर ‘सरकत्या’ झुल्याप्रमाणे पसरलेलं आहे. तेथे टेम्पो उभा आहे आणि काही लोकही आहेत. फ्लॅटमधील एक व्यक्ती काही सामान त्या कापडी स्लाइडवरून खाली पाठवते. ते सामान काही क्षणात टेम्पोपर्यंत पोहोचते आणि ती व्यक्ती थोड्याच वेळात टेम्पोवर माल चढवते. खरच, जास्त मेहनत न करता इमारतीतील सामान उतरवून ते टेम्पोमध्ये चढवण्याचा हा अप्रतिम जुगाड वाखाणण्याजोगा आहे. अर्थात तसं करणं कितपत सुरक्षित, याबद्दल शंका आहे. या मजेशीर जुगाडचा व्हिडिओ satisfyingnaturehub या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: Good news MorningIndustrialist Anand MahindraJugaadnecessityउद्योगपती आनंद महिंद्रागरजगुड न्यूज मॉर्निंगचांगली बातमीजुगाड
Previous Post

राज्यात २५९१ नवे रुग्ण, २८९४ बरे! मुंबई ३९९, पुणे ८९७, ठाणे ३०८

Next Post

झुनझुनवालांच्या अकासा एअरलाइन्सची लवकरच भरारी, जोरदार तयारी!

Next Post
Akasa Airlines

झुनझुनवालांच्या अकासा एअरलाइन्सची लवकरच भरारी, जोरदार तयारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!