Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

महाराष्ट्रातील प्रत्येकाला लस द्या, उद्योगपती महिंद्रांची मागणी

आर्थिक केंद्र महाराष्ट्राला लॉकडाऊन परवडणारे नाही, लसींचा तुटवडा नको!

March 16, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
anand mahindra

मुक्तपीठ टीम

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला लस देण्यासाठी तातडीची परवानगी देण्याची मागणी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केली आहे. महाराष्ट्रात सध्या रोज किमान १५ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत असल्याने सोमवारपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर जर लोकांनी नियम पाळले नाहीत तर लॉकडाऊनचा इशाराही सातत्याने दिला जात आहे. त्याचवेळी महाराष्ट्राच्या आवश्यकतेच्या प्रमाणात लसीकरण होत नसल्याचा सूरही उमटत आहे. या पार्श्वभूमीवर महिंद्रांची मागणी महत्वाची आहे. त्यांनी लसींच्या तुटवड्याचा उल्लेख करत केंद्र सरकारकडूनही अपेक्षा व्यक्त केल्याचे मानले जात आहे.

 

गेल्या वर्षी सापडत होते तेवढे कोरोनाचे नवे रुग्ण आता महाराष्ट्रात पुन्हा सापडू लागले आहेत. लोकांनी निर्बंध पाळले नाहीत तर ते एका महिन्यात दिवसाला २५ हजारावर जाण्याचा अंदाज राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात व्यापक प्रमाणावर कोरोना लसीकरणाची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे. तशी मागणीही राज्यात जोर धरु लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही पुण्यासाठी तशी परवानगी मिळावी, असे म्हटले होते.

 

Over half the new daily cases are in Maharashtra.The state is the nerve-centre of the country’s economic activity & more lockdowns will be debilitating. Maharashtra needs emergency permission to vaccinate EVERY willing person. No shortage of vaccines. @PMOIndia @drharshvardhan https://t.co/AemBFcrAd7

— anand mahindra (@anandmahindra) March 15, 2021

महाराष्ट्राचे देशातील आर्थिक महत्व लक्षात घेता या राज्यात लसीकरणावर जास्त भर देण्याची मागणी जोर धरत आहे. महिंद्रा समुहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटद्वारेही ही मागणी केली. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की लसींचा तुटवड्यामुळे लसीकरणाची गती मंदावते आहे. जर आपण लसीकरणाचा वेग वाढवला नाही तर दुसरी, तिसरी, चौथीही लाटही सहन करावी लागेल. महाराष्ट्रासारख्या आर्थिक केंद्राला सारखे लॉकडाऊन परवडणारे नसतील.


Tags: anand mahindraanand mahindra on corona vaccination in Maharashtracorona vaccinationMaharashtraआनंद महिंद्राआनंद्र महिंद्रांची महाराष्ट्रात लसीकरण वाढवण्याची मागणीकोरोना लसीकरणमहाराष्ट्र
Previous Post

#मुक्तपीठ मंगळवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

सचिन वाझेंचं निमित्त…किरीट सोमय्यांकडून पवार-ठाकरे लक्ष्य!

Next Post
kirit somiyya

सचिन वाझेंचं निमित्त...किरीट सोमय्यांकडून पवार-ठाकरे लक्ष्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!