मुक्तपीठ टीम
देशातील सर्वात मोठी डेअरी ब्रॅन्ड अमूलची २०२०-२१ या आर्थिक वर्षात ३९ हजार २४८ कोटींची उलाढाल झाली आहे. या संपूर्ण समूहाचा व्यवसाय ५३ हजार कोटींच्या पुढे गेला आहे. कंपनीच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा विक्रमी व्यवसाय आहे. गेल्या वर्षी ३८ हजार ५४२ कोटींची उलाढाल झाली होती.
अमूलची वाढती उलाढाल, एका वर्षात ७०० कोटींची वाढ!
• गेल्या वर्षी अमूलची उलाढाल ३८ हजार ५४२ कोटी रुपये होती.
• या आर्थिक वर्षात ३९ हजार २४८ कोटींची उलाढाल झाली आहे.
• २०२५ पर्यंत दुप्पट करून १ लाख कोटी करण्याचे उद्दिष्ट आहे.
• सध्या अमूल जगातली आठव्या क्रमांकाची सर्वात मोठी दूध उत्पादक आहे.
• २०१२ मध्ये अमूल १८ व्या क्रमांकावर होता.
• सन २०२१ मध्ये दूध उत्पादनात सदस्यांनी १४% वाढ केली आहे.
• अमूलतर्फे ४० लाख लिटर दुधाचे व्यवस्थापन केले जाते.
पॅकबंद उत्पादनांची विक्री वाढली
• पॅकबंद दूध, चीज, बटर आणि आइस्क्रीमचा खप कोरोनाच्या काळात जास्त वाढत आहे.
• अमूलची पॅकबंद उत्पादने ब्रिटानिया आणि हिंदुस्तान युनिलिव्हर सारख्या देशातील बड्या कंपन्यांशी स्पर्धा करतात.
• या उत्पादनांची विक्री वार्षिक ८.१% दराने वाढत आहेत.
अमूलचा प्रवास गुजरातमधून देशव्यापी
• अमूलने आपला प्रवास गुजरातेतून सुरू केला.
• नंतर त्याचा विस्तार उत्तर भारत आणि त्यानंतर महाराष्ट्रासह पूर्व भारतपर्यंत झाला.
• कंपनीने गेल्या वर्षी प्रथमच दक्षिण भारतात प्रवेश केला आणि हैदराबादला केंद्र बनविले.