मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारने १ जुलैपासून एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पॅक केलेले ज्यूस आणि दुग्धजन्य पदार्थांसोबत मिळणाऱ्या प्लास्टिकच्या स्ट्रॉवरही बंदी येणार आहे. या निर्णयामुळे पॅक दूध, दुग्धजन्य पदार्थ, फळांचे रस, इतर पेयांसाठी आवश्यक प्लास्टिक स्ट्रॉच्या वापरावर बंदी आल्यास होणाऱ्या नुकसानाकडे ‘अमूल’ने सरकारचे लक्ष वेधले आहे. अमूलप्रमाणेच फ्रुटीसारख्या फळांच्या पॅक रसांचे उत्पादन करणाऱ्या पार्ले अॅग्रोनेही स्ट्रॉवरील बंदीला विरोध केला आहे.
अमूलची प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी पुढे ढकलण्याची मागणी का?
- १ जुलै २०२२ पासून एकेरी वापराच्या प्लास्टिकवर सरकारची बंदी लागू होईल.
- अमूलने प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी काही काळासाठी पुढे ढकलण्याची विनंती सरकारला केली आहे.
- सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांवर वाईट परिणाम होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या दूध उत्पादक देशात दुधाचा वापर कमी होणार असल्याचे अमूलने म्हटले आहे.
- पर्यावरण मंत्रालयाने प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी एक वर्षासाठी पुढे ढकलण्याची विनंती आहे.
- देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेपर स्ट्रॉचा तुटवडा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
- अमूलच्या बटर मिल्क आणि लस्सीच्या टेट्रा पॅकसोबत प्लास्टिकचा स्ट्रॉ जोडलेला आहे.
- अमूलला दररोज १० ते १२ लाख प्लास्टिक स्ट्रॉ लागतात.
- पेपर स्ट्रॉ उत्पादनासाठी सुविधा विकसित करण्यासाठी स्थानिक उद्योगाला एक वर्षाचा कालावधी द्यावा.
फ्रुटीवाल्या पार्ले अॅग्रोचीही विनंती
- प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी एक वर्षासाठी पुढे ढकलण्याची विनंती पार्ले अॅग्रोनेही केली आहे.
- पार्ले अॅग्रोच्या लोकप्रिय ब्रँड्समध्ये ‘फ्रुटी’ आणि ‘अॅप्पी’ यांचा समावेश आहे.
- या पेयांच्या वापरासाठीही प्लास्टिक स्ट्रॉची आवश्यकता असते.