मुक्तपीठ टीम
“कोण कोणास म्हणाले –
व्यवहार माझे,
जबाबदार वाझे!
सांगा पाहू …….”
कोण कोणास म्हणाले –
*व्यवहार माझे,*
*जबाबदार वाझे!*
सांगा पाहू …….— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 19, 2021
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेले ताजे ट्वीट चर्चेचा विषय बनले आहे. नेहमीप्रमाणेच भाजपसमर्थकांकडून त्यांचे कौतुक होत असतानाच भाजपविरोधकांकडून ट्विटवर टीका करतानाच त्यांच्याच शैलीत उत्तर दिलं जात आहे.
#पतिराज_माझे_महाराष्ट्राला_ओझे
अटक मटक ट्विटर वर भटक
माझे पतीराज परत येईना
माझे गायन कोणी ऐकेना
आणि ट्विटायची खाज माझी जाईना !!@ShivSena @ShivsenaComms @AUThackeray @SardesaiVarun @the_yuvasena https://t.co/QbF3c8nDu1— Sheetal Swapnil Sheth (@SheetalSheth_) March 20, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून अमृता फडणवीस या ट्विटरवर त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे टीका करत असतात. बऱ्याचवेळा त्यांचे मुद्दे हे टीकेच्या भोवऱ्यात सापडतात. आताही तसेच होताना दिसत आहे.
कोण कोणास म्हणाले –
*पुलवामा स्फोटाचे पाप तुमचे,*
*तपासात अडथळ्याचे पाप आमचे*
सांगा पाहू …….— Anagha Acharya – अनघा आचार्य (@AnaghaAcharya) March 20, 2021
अमृता फडणवीस यांनी योग्य नेम साधलाय. लक्ष्याचा वेध घेतलाय. असे भाजपा समर्थक ट्विट करून कौतुक करत आहेत. भाजपाविरोधकांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया या अमृता फडणवीसांनी योग्य ठिकाणी वार केल्याचे दाखवणाऱ्या असल्याचे मत मांडले जात आहे. तर दुसरीकडे भाजपाविरोधक त्यांच्यावर टीकेचा पाऊस पाडत आहेत. सचिन वाझे प्रकरण मांडताना अमृता फडणवीस यीं अन्वय नाईक या मराठी इंडरिअर डेकोरेटरच्या आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्या अर्णब गोस्वामीला का वाचवले गेले, तेही मांडावे असे सुचवले जात आहे. अमृता फडणवीसांच्या गाण्याच्या आवडीचाही उल्लेख करत काही ट्विटरकरांनी त्यांच्या शैलीतच त्यांना उत्तर दिले आहे. अमृता फडणवीस याच्या ट्विटनंतर सुरु झालेल्या ट्रेलमधील काही निवडक ट्विट:
तिर बरोबर लागलाय अमृता ताईंचा
— महेंद्र बाहुबली (@iamamol) March 20, 2021
ट्विट -१:
हे परत येणार..
हे परत येणार म्हणून ठेवले मी देव पाण्यात,
दादांनी दिली साथ, म्हणून निघाली वरात,
भटजी म्हणून, आले तात्या भरात,
पण, मुलगी निघाली फेंगडी पायात,
अन लग्नाच्या 14 तासात,
झाला डायवोर्स चा बार !हसा रे 😂😂😂😂😂 https://t.co/mY5t2w7OZM
— RAJ (@Jagtap_amolin) March 19, 2021
ट्विट -२:
@OfficeofUT म्हणतात ‘वझे’ काय लादेन आहेत का?@rautsanjay61 सामना मध्ये म्हणतात निष्पाप आहेत वझे.
हगुन ठेवलं यांनी आणि साफ करणार वझे.
‘कुणाच्या खांद्यावरं, कुणाचे ‘वझे’ ‘— ! हम भारतीय ! We The Bharatiya ! (@i_ratnadeep) March 19, 2021
ट्विट -३:
कोण कोणास म्हणाले –
“मी पुन्हा येईन”
येता येता दमले,
दिल्लीच्या हुजरेगिरीत रमले.
सांगा कोण?— मुंबईकर गिरीश (@girishdgr8) March 19, 2021
ट्विट -४:
माजा अर्णब माजी जबाबदारी :—टरबूज 💯😂
— बाळासाहेबांचा शिवसैनिक 🏹 (@d590NMx8dstLnQv) March 19, 2021
ट्विट -५:
कोण कोणास म्हणाले –
“मी पुन्हा येईन”
येता येता दमले,
दिल्लीच्या हुजरेगिरीत रमले.
सांगा कोण?— मुंबईकर गिरीश (@girishdgr8) March 19, 2021
ट्विट -६:
महाराष्ट्राचे नावडते व्यक्तिमत्व बेबी पेंग्विन चे वडील महाराष्ट्राच्या जनतेला म्हणाले
— दत्तात्रय मुळ्ये (@dattatrayamuly1) March 19, 2021
ट्विट -७:
रावण इतका अंहकारी होता पण तरीही कधी मंदोदरीने राजकारणात नाक नाही खुपसल पण ह्या महाराष्ट्राच्या मंदोदरीना विनाकारण नाक खुपसायची घाणेरडी सवय आहे. आपल्यातली गायनाची कला लहानपणापसुन असल्याच्या बाता मारणाऱ्या ह्या गायिकेला आपला नवरा मुख्यमंत्री झाल्यावरच कशी काय गायनाची बुध्दी सुचली.
— Anand Ganesh Nabar (@imrealAGN) March 19, 2021
ट्विट -८:
मंदोदरी शेकडो जमिनींचे व्यवहार सुद्धा करतं नव्हती आणि रावण कीतीही शक्तिशाली असला तरी खंडण्या वसूली करतं न्हवता😂
— NationFirst (@indiafirst_19) March 19, 2021
अमृता फडणवीस यांच्या शुक्रवार संध्याकाळच्या ट्विटनंतर सुरु झालेला प्रतिक्रियांचा पाऊस आताही सुरुच आहे.