Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

अॅट्रोसिटी तपास अधिकारी बदलण्याच्या प्रस्तावातून राज्य सरकारकडून मूळ कायद्यालाच आव्हान!

January 16, 2022
in घडलं-बिघडलं
0
Antrocity Act

अमोल वेटम

महाराष्ट्र शासनाचे गृह विभाग यांनी संदर्भ क्र.पीसीआर-०६२१/प्र.क्र.१७४/विशा ६ गृहविभाग, मंत्रालय, मुंबई अन्वये दिनांक १०.०१.२०२२ रोजी पोलीस महासंचालक यांना पत्र पाठविले आहे. याची प्रत अपर पोलीस महासंचालक , नागरी हक्क संरक्षण विभागाकडे देखील पाठविण्यात आली आहे. सदर पत्र सोशल मिडीयावर वायरल होत आहे. या पत्राचा विषय हा पुढीलप्रमाणे आहे –  अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अन्वये दाखल गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार पोलीस निरीक्षक (गट अ) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (गट ब ) दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रधान करण्याबाबतचा प्रस्ताव.  या विषयाच्या अनुषंगाने विधी व न्याय विभागाने सहमती दर्शविली आहे असे देखील या पत्रात नमूद केली आहे. सोबतच या अनुषंगाने अधिसूचनेचा प्रारूप शासनास तात्काळ सादर करण्याबाबतचे देखील नमूद आहे.

काय आहे कायदा :

Scheduled Caste and Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Rules 1995 – याधील Rule 7 – Investigation should be done by Police Officer not below the rank of Deputy Superintendent of Police असे स्पष्ट नमूद आहे. हे माहित असून देखील राज्याचे विधी व न्याय विभाग तसेच पोलीस महासंचालक हे संसदेत पारित झालेला केंद्रीय कायदा व महामहीम राष्ट्रपती महोदय यांनी स्वाक्षरी केलेल्या सदर कायद्यालाच आव्हान देत आहेत. याबाबत मूळ कायद्यात दुरुस्ती करण्याचा राज्याला कोणताही अधिकार प्राप्त होत नाही. भारतीय संविधानाची उघड पायमल्ली राज्य सरकारकडून होत आहे.

राज्यात आजरोजी १४,२०२ खटले अँट्रोसीटी कायद्यांतर्गत प्रलंबित आहेत, तर ७७० हून अधिक गुन्हे हे पोलीस तपासकामी ६० दिवासापेक्षा अधिक काळ प्रलंबित आहेत, कर्तव्यात कसूर कामी सदर पोलिसांवर कारवाई  केली जात नाही. विशेष न्यायालय केवळ ५ जिल्ह्यातच आहे, मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या राज्यस्तरीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक गेल्या दोन वर्षापासून झालेली नाही , तर जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या  बैठका देखील ३ महिन्यातून होताना दिसत नाही. दिवसांदिवस जातीय अन्याय अत्याचारात वाढ होत आहे , राज्य सरकार याकडे लक्ष न देता असंवेधानिक पद्धतीने मूळ कायद्यावर घाला घालत आहे.

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अन्वये दाखल गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार पोलीस निरीक्षक (गट अ ) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (गट ब ) दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रधान करण्याबाबतचा राज्य सरकारचा प्रस्ताव हा मूळ कायद्याच्या विरोधात असल्याने तात्काळ सदर प्रस्ताव मागे घेऊन रद्द करावा अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंंट्स् युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी मुख्यमंत्री यांना केली आहे. सदर पत्र महामहीम राष्ट्रपती, राज्यपाल, केंद्रीय अनुसूचित जाती आयोग, यांना देखील पाठविण्यात आले आहे.

 

Amol Vetam 28-12-21

(लेखक अमोल बबन वेटम हे रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख आहेत. ते २०१३पासून विद्यार्थी चळवळीत सक्रिय आहेत.  अन्यायाविरुद्ध आंदोलन करत न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नरत असतात.)

संपर्क – ९७६५३२६७३२ ट्विटर @RSU_Speaks


Tags: Amol VetamAtrocity ActRepublican Students Unionअमोल बबन वेटमअॅट्रोसिटी कायदारिपब्लिकन स्टुडंट्स युनियन
Previous Post

पहिल्या ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’त ‘खिसा’ सर्वोत्कृष्ट!

Next Post

महाअलर्ट! राज्यात सौम्य ओमायक्रॉनचे कमी तर घातक डेल्टाचेच ६८ टक्के कोरोना रुग्ण!

Next Post
Delta varient have more corona patient than omicron varient

महाअलर्ट! राज्यात सौम्य ओमायक्रॉनचे कमी तर घातक डेल्टाचेच ६८ टक्के कोरोना रुग्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!