मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत कोरोना लसींच्या पुरवठ्यावरून मोदी सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीची आठवण करून दिली. सध्याच्या निकषांनुसार महाराष्ट्राला दर आठवड्याच्या मागणीपैकी केवळ २५ टक्के लसींचा पुरवठा केला जात आहे. बाकी देशांना आपण लसींचा पुरवठा करणे चांगली बाब आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणुकीप्रमाणे “ज्याचा बालेकिल्ला मजबूत त्याचा गड सुरक्षित, ज्याचा गड सुरक्षित त्याचा मुलूख सुरक्षित” म्हणून महाराष्ट्राची २० लाख लसींच्या मागणी तात्काळ पूर्ण केली जावी, अशी मागणीही अमोल कोल्हे यांनी केली.
इंडियन हेल्थ सर्व्हिसची सूचना
आयएएस आणि आयपीएसच्या धर्तीवर आरोग्य क्षेत्रासाठी देखील ‘इंडियन हेल्थ सर्व्हिसेस’ सुरू करावी. जेणेकरून आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या हातात देशाच्या आरोग्याचा कारभार सोपविला जाऊ शकेल,’ असा मुद्दा अमोल कोल्हे यांनी यावेळी मांडला.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या मागण्या व अनुदान याबाबत लोकसभेतील चर्चेत @NCPspeaks च्या वतीने भाग घेतला. यावेळी आयएएस व आयपीएस च्या धर्तीवर इंडियन हेल्थ सर्विसेस सुरु करावी, यामुळे आरोग्य क्षेत्रास तज्ज्ञ व प्रशासकीय कौशल्य असणारे मनुष्यबळ उपलब्ध होईल हा मुद्दा मांडला pic.twitter.com/C5J4x12g9Q
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) March 17, 2021
आरोग्य – शिक्षणासाठीच्या कराचा पैसा जातो कुठे?
‘केंद्र सरकार आरोग्य आणि शिक्षणासाठी ४ टक्के कर वसूल करतो. त्याचा विनियोग कसा आणि कुठे केला याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली. आरोग्य यंत्रणेमध्ये आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे हे कोरोनामुळं आपल्याला कळून चुकलं आहे. त्यामुळं आरोग्य सेवेसाठीच्या धोरणनिश्चिती आणि उपाययोजना केल्या जाव्यात.
कोरोना संकटातही आरोग्यासाठी अल्प तरतूद
‘केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यासाठी सरकारनं अर्थसंकल्पात २ लाख २३ हजार कोटी रुपये निधीची तरतूद केल्याचे सांगितले. परंतु ही तरतूद अर्थसंकल्पाच्या केवळ ३२ टक्के एवढी आहे. म्हणजे केवळ ७२ हजार कोटी रुपये आरोग्यासाठी राखून ठेवले गेले आहेत. ही रक्कम आपल्या जीडीपीच्या केवळ १.५ टक्के इतकीच आहे. करोना संकटकाळात आरोग्य व्यवस्थेमधील त्रुटी दिसून आले असताना देखील ही अल्प तरतूद आरोग्यासाठी करण्यात आली आहे, याबद्दल कोल्हे यांनी चिंता व्यक्त केली.
लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सरकारी रुग्णालये उभारा
‘केंद्र सरकारनं देशभरात २२ एम्स निर्माण करण्याची घोषणा केली. पण यासोबतच सरकारी रुग्णालयांच्या निर्मितीसाठी भौगोलिक विभागणीसोबत लोकसंख्येच्या घनतेचे निकष देखील विचारात घेतले पाहिजेत. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सरकारी रुग्णालयांची उभारणी केली गेली पाहिजे.
आपल्या जीडीपीच्या केवळ १.५ टक्के इतकीच ही रक्कम आहे. कोरोना संकटकाळात आरोग्य व्यवस्थेमधील दोष दिसून आले असताना देखील ही अल्प तरतूद आरोग्यासाठी केली याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. केंद्र सरकारने देशभरात २२ एम्स निर्माण करण्याची घोषणा केली.
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) March 17, 2021
महामार्गावर दर ५० किलोमीटरवर ट्रॉमा केअर रुग्णालय आवश्यक
दरवर्षी रस्त्यांवरील अपघातांमध्ये जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. तर साडे चार लाख लोक अपंग होतात. यात सर्वाधिक तरुण व मध्यमवयीन व्यक्तींचा समावेश आहे. अपघातानंतर वेळेवर मिळणारे उपचार अर्थात ‘ट्रिटमेंट इन गोल्डन अवर’ महत्त्वाचे असतात. त्यामुळं महामार्गावर दर ५० किलोमीटरवर ट्रॉमा केअर रुग्णालयांची उभारणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
पण यासोबतच सरकारी हॉस्पिटल्सच्या निर्मितीसाठी भौगोलिक विभागणीसोबत लोकसंख्येच्या घनतेचे निकष देखील विचारात घेतले पाहीजे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सरकारी हॉस्पिटल्सची उभारणी केली गेली पाहीजे. दरवर्षी रस्त्यांवरील अपघातांमध्ये जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. pic.twitter.com/8wzagYWfWj
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) March 17, 2021
शिरुरमधील मेडीसिटीचा वेगळा प्रयोग
‘शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप आणि सीएसआरच्या माध्यमातून इंद्रायणी मेडीसिटी प्रोजेक्ट राबविला जात आहे. यामध्ये ९ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि डायग्नॉस्टिक सेंटरचा यामध्ये समावेश असणार आहे, याकरिता केंद्र सरकारने विशेष निधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली.
आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप आणि सीएसआरच्या माध्यमातून इंद्रायणी मेडीसिटी प्रोजेक्ट सुरू करत आहोत. यामध्ये ९ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि डायग्नॉस्टिक सेंटरचा यामध्ये समावेश आहे,यासाठी केंद्र सरकारने विशेष निधी द्यावा अशी मागणीही यावेळी केली. pic.twitter.com/ulVq3pQLDs
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) March 17, 2021
‘ज्याचा गड सुरक्षित, त्याचा मुलुख सुरक्षित’
सध्याच्या निकषांनुसार महाराष्ट्राला सध्या ३ कोटी ५४ लाख लसींची गरज आहे. परंतु आजपर्यंत केवळ ६५ लाख ४९ हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. दर आठवड्याच्या मागणीपैकी केवळ २५ टक्के पुरवठा केला जात आहे. बाकी देशांमध्ये आपण लसींचा पुरवठा करत आहोत त्याबद्दल अभिनंदन होतय, दुसऱ्यांची मदत करणे चांगली बाब आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणुकीप्रमाणे’ ज्याचा बालेकिल्ला मजबूत त्याचा गड सुरक्षित, ज्याचा गड सुरक्षित त्याचा मुलूख सुरक्षित’ म्हणून महाराष्ट्राची २० लाख लसींच्या मागणीची पुर्तता तात्काळ केली जावी, अशी मागणीही अमोल कोल्हे यांनी केली.