मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. सतत वाढता उद्रेक, मृत्यूचं सत्र यामुळे नागरिकांसह कोरोना योद्धेही तणावाखाली असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक खचून जात आहेत. ही परिस्थिती ओळखून महानायक अमिताभ बच्चन यांनी एक जोशपूर्ण आणि मनोबल वाढवणारा व्हिडीओ तयार केला आहे. मनोबल वाढवत लढण्याची हिंमत देणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्वत: अमिताभ यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर अकाउंट्सवर तो व्हिडीओ शेअर केला आहे.
T 3901 – WE FIGHT .. come together .. WE WILL WIN !!️ pic.twitter.com/KxkYKX8O9f
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 11, 2021
महानायक अमिताभ बच्चन या व्हिडीओत आपले दिवंगत वडिल आणि कवी हरिवंश राय बच्चन यांनी लिहिलेली ‘अग्नि सी धधक-धधक’ ही कविता वाचताना दिसत आहेत. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, “आपण एकत्र लढू आणि जिंकू!”
T 3901 – WE FIGHT .. come together .. WE WILL WIN !!️ ❤️ 🙏🏼 pic.twitter.com/wmFjy29hws
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 11, 2021
मदत करुन ट्रोलर्सना दिले प्रत्युत्तर
• अमिताभ बच्चन फक्त लढू म्हणून थांबलेले नाहीत, तर त्यांनी अलिकडेच कोरोनाशी लढा देत असणाऱ्यांना मदतही केली आहे.
• अमिताभ यांनी दिल्लीतील शिख गुरुद्वाराला २ कोटी रुपये आणि ऑक्सिजन सिलिंडर दान दिले आहेत.
• काही दिवसांपासून कोरोनाच्या संकट काळात अमिताभ बच्चन कोणतीच मदत करत नसल्याचे म्हणत त्यांना ट्रोल केले जात होते.
• पण गुरुद्वाराला दिलेल्या मदतीमुळे ट्रोलर्सना त्यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळत आहे.
शांति, शोर से ज़्यादा सुनायी देती है ! 🙏 शोर वो ही करता है, जो कुछ नहीं कर रहा है । जो कर रहा है, उसे बोलने कि ज़रूरत नहीं ; क्यूँकि जिनके लिए कुछ किया गया है, वो जानते हैं कि उनके लिए किसने किया है । https://t.co/g6LRc6NKDg
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 5, 2021
दान देतो…पण देखावा नाही!
• अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती.
• त्यात त्यांनी लिहिले होते की, हो मी चॅरिटी करतो, पण मला असे वाटते की, बोलण्यापेक्षा करणे हे कधीपण चांगले आहे.
• माझ्या कुटुंबानी गेल्या काही वर्षात चॅरिटी केली आहे, पण त्यांनी त्याचे सोशल मीडियावर शो-ऑफ केले नाही.
• ते फक्त घेणाऱ्यांना माहिती आहे.
• तसेच त्यांनी अनेक देणग्या आणि चॅरिटी संस्थांचा उल्लेख सुद्धा केला आहे.