मुक्तपीठ टीम
कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटद्वारे पलटवार केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांच्या ट्विटवर अमित शाह म्हणाले, “कोणताच प्रपोगंडा देशाच्या एकतेला तोडू शकणार नाही. कोणताच प्रपोगंडा भारताला उंचावर जाण्यापासून रोखू शकत नाही. कोणताच प्रपोगंडा भारताचे भवितव्य ठरवू शकत नाही. प्रगती साधण्यासाठी भारत एकजूट आणि एकत्र उभा आहे.” त्यांनी या ट्विटमध्ये इंडिया अगेन्स्ट प्रपोगंडा आणि इंडिया टूगेदर हे हॅशटॅग वापरले आहेत.
No propaganda can deter India’s unity!
No propaganda can stop India to attain new heights!
Propaganda can not decide India’s fate only ‘Progress’ can.
India stands united and together to achieve progress.#IndiaAgainstPropaganda#IndiaTogether https://t.co/ZJXYzGieCt
— Amit Shah (@AmitShah) February 3, 2021
विदेशी सेलिब्रिटींचे शेतकरी आंदोलनावर ट्विट
पॉप स्टार रिहाना, पर्यावरणतज्ज्ञ ग्रेटा थनबर्ग, मिया खलिफा आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी कृषी आंदोलनाबाबत ट्विट केले आहे. पॉप स्टार रिहाना म्हणाली, “शेतकरी आंदोलनाबाबत का बोलले जात नाही.”
तर पर्यावरणतज्ज्ञ ग्रेटा थनबर्ग म्हणाल्या, “आम्ही भारतातील शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहोत.”
why aren’t we talking about this?! #FarmersProtest https://t.co/obmIlXhK9S
— Rihanna (@rihanna) February 2, 2021
We stand in solidarity with the #FarmersProtest in India.
https://t.co/tqvR0oHgo0— Greta Thunberg (@GretaThunberg) February 2, 2021
संपूर्ण माहिती नसताना कोणतेही वक्तव्य करणे चूक
शेतकरी आंदोलनाविराधात विदेशातील सेलिब्रिटींनी जी वक्तव्य केली आहेत, त्यावर सरकारने नाराजी दर्शवली आहे. कोणत्याही विषयाबद्दल संपूर्ण माहिती नसताना बोलणे चुकीचे आहे. अशा प्रकारची वक्तव्य करण्याआधी संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. सरकार जेव्हा कोणताही निर्णय घेते तेव्हा सगळ्यांचा विचार करुनच घेते. या व्यक्तींना भरपूर लोक फॉलो करत असतात. त्यामुळे जेव्हा प्रसिद्ध व्यक्ती काणतेही वक्तव्य करतात तेव्हा त्यांनी या सगळ्या गोष्टींचे भान राखणे गरजेचे आहे.
Farmers constitute an extremely important part of our country. And the efforts being undertaken to resolve their issues are evident. Let’s support an amicable resolution, rather than paying attention to anyone creating differences. 🙏🏻#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda https://t.co/LgAn6tIwWp
— Akshay Kumar (@akshaykumar) February 3, 2021
सरकारला पाठिंबा देण्यासाठी अक्षय कुमार, अजय देवगनसह इतरही अभिनेते
अक्षय कुमार, अजय देवगन यांच्यासह अनेक अभिनेत्यांनी सरकारच्या समर्थनात ट्विट केले आहे. रिहानाच्या ट्विटला रिट्विट करत अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अजय देवगण आणि करण जोहर यांनी इंडिया टूगेदर हॅशटॅग वापरुन सरकारला पाठिंबा दिला आहे. अभिनेता अक्षय कुमार यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांच्या ट्विटला रिट्विट करत म्हटले, “सरकार शेतकर्यांच्या हिताचाच विचार करत आहे.”