Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इमारतीच्या बांधकामाला गती द्यावी”

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या सूचना

August 26, 2021
in सरकारी बातम्या
0
amit deshmukh

मुक्तपीठ टीम

चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्यात येत असून नवीन प्रस्तावित असलेल्या इमारतीच्या बांधकामाला गती देऊन इमारतीचे काम सप्टेंबर अखेरीस पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या.

 

चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे बांधकाम दिलेल्या कालावधीत पूर्ण करावे तसेच शासकीय महाविद्यालयातील डॉक्टर (विषय तज्ज्ञ) व कर्मचारी यांची पदे तातडीने भरावीत अशी मागणी बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली.

 

चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय बांधकामाच्या समस्यांबाबत मंत्रालयातील वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीला बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, दूरदृश्यप्रणालीद्वारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, अधिष्ठाता डॉ.अविनाश टेकाडे यासह एचएससीसी या कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

 

वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले की, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर पागलबाबा नगर येथे महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे काम सध्या सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे हे काम जरी वेगाने सुरु नसले तरी आता मात्र नवीन इमारतीचे बांधकाम वेगाने पूर्ण होणे आवश्यक असून सर्व इमारतीचे बांधकाम नोव्हेंबर अखेर पूर्ण करण्यासाठी कालबद्ध नियोजन करणे आवश्यक आहे. वैद्यकीय महाविद्यालयात सर्व अत्याधुनिक सुविधा उभारत असताना पाणी, वीज यांच्यासह फर्निचर आणि रुग्णालयासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्रीही कार्यान्वित असणे आवश्यक असल्याने याबाबतही नियोजन करण्यात यावे.

 

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लवकरच वर्ग एक व वर्ग दोनची पदभरती प्रक्रिया सुरू होणार आहे. तर वर्ग तीनची पदभरती वैद्यकीय शिक्षण संचालक कार्यालयाकडून होईल. तसेच अधिष्ठाता यांच्या अखत्यारित त्यांना वर्ग चारची पदे भरता येतील. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या बांधकामासाठी अपुऱ्या असलेल्या जागेच्या प्रश्नासाठी जिल्हाधिकारी यांनी स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेवून तातडीने कार्यवाही करावी. ज्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे अशा निवासी इमारतींचे विद्युतीकरण व पाणीपुरवठा सुरळीत करून तातडीने संबधित विभागाकडे हस्तांतरीत करण्याच्या सूचनाही देशमुख यांनी दिल्या.

 

पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू आहे, हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. जिल्ह्यातील जनतेला आरोग्य सुविधा उत्कृष्टरित्या मिळावी यासाठी शासकीय महाविद्यालयातील डॉक्टर (विषय तज्ज्ञ) व कर्मचारी यांची पदे तातडीने भरावीत, जेवढे बांधकाम पूर्ण झाले आहे त्यामध्ये विद्युतीकरण व पाणीपुरवठा ही सुरळीत करण्यात यावा व पुर्ण झालेल्या इमारती शासनाकडे हस्तांतरित करण्यात याव्यात. शासकीय महाविद्यालयाचा पाण्याचा प्रश्नदेखील तातडीने सोडवावा. वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाकरिता पूर्णवेळ अधिष्ठाता पदाची भरती व्हावी, हाफकीनकडून जी औषधे खरेदी केली जातात त्याबाबतच्या नियमावलीमध्ये शिथिलता देण्यात यावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

 

कोरोना रुग्णालय सुरुच ठेवण्यात यावे

चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयाचे कामकाज सुरुळीत होणे आवश्यक आहे. राज्यात कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे महिला रूग्णालयात कोरोना रूग्णालय सुरु करण्यात आले असून अजून काही काळ हे रुग्णालय सुरु ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सुरु असलेले नवीन इमारतीचे काम वेळेत आणि नियोजनबध्द पूर्ण होणे आवश्यक आहे. येत्या शनिवारी यासंदर्भात चंद्रपूर येथे विस्तृत बैठक घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचना वडेट्‌टीवार यांनी दिल्या.

 


Tags: amit deshmukhchandrapurMinister Vijay wadettiwarअमित देशमुखचंद्रपूरमहाराष्ट्र लोकसेवा आयोगविजय वडेट्टीवारी
Previous Post

कोरोना संकटातही सवलतींमुळे म्हाडा मुंबई मंडळाला विक्रमी महसूल

Next Post

“भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही”: नवाब मलिक

Next Post
nawab malik

"भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही": नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!