मुक्तपीठ टीम
राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. प्रत्येक मंडळाने आपापल्या मंडळात वेगवेगळी सजावट केली आहे. तर काही मंडळांच्या मंडपात गणपती बाप्पाच्या महाकाय मूर्ती विराजमान झाल्या आहेत.
अंधेरीमधील आंबोली म्हातारपाडा भागात एक जुनं मंडळ आहे. आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. या मंडळाची स्थापना १९७० साली झाली. या मंडळाच्या उत्सवाचे ५३वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिमाखात गणेशोत्सव साजरा होत आहे.
अगदी पहिल्या वर्षापासून हे मंडळ वेगवेगळे देखावे सादर करतं. या वर्षी मंडळाने ‘लाल किल्ला’ भव्य प्रवेश उभारला आहे. जागा तशी कमी असूनही उत्तम देखावा साकारण्यात आला आहे.
कोरोना काळात आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गरजू लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली. काहींना धान्य वाटप केले. रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शालेय मुलांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. लहान मुलांसाठी पोलिओ डोस शिबिराचे आयोजन केले होते. आजारी रुग्णांना आर्थिक मदतही केली गेली. अशा प्रकारे हे मंडळ भक्तीप्रमाणेच सेवाभावातही मग्न असतं.
आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यात मार्गदर्शक आयवन विल्सन परेश, अध्यक्ष भिकानी सकपाळ, उपाध्यक्ष सुरेश खोत, सरचिटणीस पांडूरंग गंगाराम रावणंग, ओमप्रकाश सिंग, उपचिटणीस रामचंद्र पाटील, संदिप कर्ले, कार्याध्यक्ष दिलीप पाटील, संजय सावंत, सचिन भालेकर, उपकार्याध्यक्ष ग्लेन चार्ली परेरा, रमेश गुंजकर, विरेश वराडकर (बबलू), नरेंद्र करदोडे, कोषाध्यक्ष विजय कवठणकर, जयवंत पोहेकर, उपकोषाध्यक्ष आनंद पवार (बाळू) आणि रविंद्र सपकाळ यांचा सहभाग आहे.
तुम्ही या मंडळाच्या उत्सवास नक्की जाऊन भेट द्या आणि गणरायाचं दर्शन घ्या…