Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

विविध आंबेडकरी संघटनांचा ३८ हून अधिक मागण्यांसाठी आझाद मैदानात एल्गार!

बार्टी, समाज कल्याण विभागाच्या निष्क्रिय कारभारामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यामध्ये नाराजी

January 27, 2022
in घडलं-बिघडलं
0
ambedkarites organisations protest against social justice dept

मुक्तपीठ टीम

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती, बौद्ध ,मागासवर्गीय समूहावर शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक नाकेबंदी करण्यात आली आहे. याबाबत मंत्री धनंजय मुंडे, बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या राजीनामाच्या मागणी सह इतर मागण्याबाबत गुरुवारी २७ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले. यामध्ये अन्याय-अत्याचार विरोधी संघर्ष समिती, रिपब्लिकन स्टुडंट्स युनियन, जनसंघर्ष क्रांती मोर्चा, इंडियन्स सोशल मुव्हमेंट, आंबेडकरी संग्राम, कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहीन शेतमजूर, शेतकरी समिती, भिमयान सोशल फौंडेशन आदीं सहभागी झाले. सदर निवेदन सामाजिक न्याय मंत्री यांना देण्यात आले.

SJSA one-day protest Against  inactive management of SWD

सन २०१८ पासून ७४८ हून अधिक एमफिल , पीएचडी विद्यार्थ्यांच्या थकीत फेलोशिप बार्टीमार्फत तात्काळ देण्यात द्यावी; बार्टी मार्फत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संस्थेना विना निविदा कोट्यावधी रुपयांचे कंत्राट दिले या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, स्कॉलरशिप करिता उत्त्पन्न मर्यादा २.५ वरून ८ लाख करावी, उच्च शिक्षणातील पदवीयुत्तर पदवी करिता फ्रीशिप सवलत सुरु करावी, जवळपास ९ लाख हून अधिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रलंबित आहेत त्या तत्काळ देण्यात यावे, परदेशी शिष्यवृत्ती, स्वाधार योजनेतील प्रलंबित रक्कम जमा करावी, समाज कल्याण हॉस्टेल दुरवस्थेबाबत विशेष तरतूद करावी,  बार्टी मार्फत कौशल्य विकास योजनेच्या नावाखाली, माहिती पुस्तक, कॅलेंडर छपाई याकरिता देखील कोट्यावधी पैसे खर्च करणे थांबबावे. बार्टीचे समतादूत, नोडल व प्रकल्प अधिकारी बरखास्त करावे.

ambedkarites organisations protest against social justice  dept

विद्यार्थ्यांचा निधी भिमा कोरेगाव प्रकरण जे न्यायप्रविष्ट आहे तिथे किवा ८७५ कोटी नागपूर येथील कामठी येथे होणाऱ्या हॉस्पिटल कडे वळते करण्यात आले आहे हा निर्णय सरकारने मागे घ्यावा, अनुसूचित जातीचा निधी इतरत्र न वळविण्याबाबत आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यासारखा कायदा महाराष्ट्र सरकारने पारित करावा व लोकसंखेनुसार अर्थसंकल्पात तरतूद करावी, अखर्चित निधी तत्काळ मार्च अखेर खर्च करण्यात यावा, जात वैधता प्रमाणपत्र तत्काळ देण्यात यावे, प्रवेशावेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती करण्यात येऊ नये याबाबत शासन निर्णय व्हावा, बौद्ध लेण्याचे संरक्षण व संवर्धन करावे.

ambedkarites organisations protest against social justice dept

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतील जाचक अटी रद्द करून बाजारभावानुसार शेत जमिनी खरेदी करून द्याव्यात, रमाई घरकुल करिता सरसकट ५ लाखांचे अनुदान द्यावे,  अँट्रोसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालय स्थापन व्हावे व विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती व आर्थिक तरतूद बाबतचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात यावे; आदी मागण्याकरिता हे आंदोलन छेडण्यात आले.  यावेळी अमोल वेटम, दादासाहेब यादव, संतोष आठवले, रमाताई आहिरे,  राजेंद्र गायकवाड,  अमित वाघवेकर, नितीन शाक्य, ,सीताराम लवांडे, बबन सोनावणे, जीवन भालेराव, दिवाकर शेजवळ, आदी सहभागी झाले.


Previous Post

“समाजासाठी भरीव योगदान देणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व!”

Next Post

पालघरमधील चिमुरड्याच्या बळीसाठी फक्त रुग्णवाहिका चालक दोषी कसे? आरोग्याच्या १७ हजार कोटीपैकी फक्त ८ हजार कोटींचा वापर!!

Next Post
plaghar kid death 25-1-22

पालघरमधील चिमुरड्याच्या बळीसाठी फक्त रुग्णवाहिका चालक दोषी कसे? आरोग्याच्या १७ हजार कोटीपैकी फक्त ८ हजार कोटींचा वापर!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!