मुक्तपीठ टीम
ज्या राज्यात राज्यपाल आहोत, त्याच राज्याविषयी मनात कमालीचा आकस- द्वेष बाळगणारे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्रातून त्वरित हटवण्यात यावे, अशी मागणी ‘आंबेडकरी संग्राम’ चे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ प्रा डॉ जी के डोंगरगावकर आणि सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी आज एका पत्रकाद्वारे केली आहे.
कोश्यारी यांना हटवण्याच्या मागणीसाठी राज्यातील सर्वंपक्षीय मराठी खासदारांनी एकजुटीने दिल्लीत नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
गुजराती आणि राजस्थानी लोकांना अलग केले तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून शिल्लक राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका समारंभात नुकतेच केले आहे. त्यावरून त्यांच्याविरोधात तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया राज्यभरात उमटल्या आहेत.
राज्यपाल हे केंद्र सरकारचे प्रतिनिधी असतात. त्या घटनात्मक पदावरील व्यक्तीचे वक्तव्य हे केंद्र सरकारच्या मनातले बोल मानले जातील, असे आंबेडकरी संग्रामने म्हटले आहे. केंद्र सरकार हे राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नसेल तर ते कृतीतून दाखवून देण्यासाठी भगतसिंग कोश्यारी यांना त्वरित महाराष्ट्रातून हटवण्यात यावे, असे डॉ डोंगरगावकर आणि शेजवळ यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.
आपले विनीत
( प्रा डॉ जी के डोंगरगावकर)
अध्यक्ष
मो:9930958025
( दिवाकर शेजवळ)
सरचिटणीस
मो: 9022609692