मुक्तपीठ टीम
आता जग सोडून गेलेल्यांचा आवाज पुन्हा जिवंत करण्याचे तंत्र विकसित झाले आहे. अॅमेझॉन त्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. ते तंत्रज्ञान पूर्णपणे विकसित झाल्यानंतर अॅलेक्सा आपल्या जवळच्या मृत व्यक्तीच्या आवाजात आपल्याशी बोलू शकेल. अॅलेक्सा टीमचे वरिष्ठ उपाध्यक्ष रोहित प्रसाद यांनी एक व्हिडिओ प्ले केला ज्यामध्ये एक मुलगा अलेक्साला विचारते “आजी मला द विझार्ड ऑफ ओझ वाचून दाखवशील का?” अलेक्सा “ओके” ने प्रतिसाद देते आणि नंतर बाळाच्या आजीच्या आवाजात कथा वाचण्यास सुरुवात करते.
गमावलेल्या व्यक्तींची साथ आवाजातून लाभणार…
- अॅमेझॉन एका फीचरवर काम करत आहे ज्यामुळे अॅलेक्सा तुमच्या मृत जवळच्या व्यक्तीच्या आवाजात बोलू शकेल.
- स्मार्ट स्पीकर लवकरच मृत मित्र-नातेवाईकांच्या आवाजात तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील कारण अॅमेझॉन सध्या यावर काम करत आहे.
- प्रिय व्यक्ती गमावण्याच्या वेदना दूर करण्यासाठी ते कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञान वापरत आहेत.
काय आहे उद्देश?
“आठवणींना पुनरुज्जीवित करणे” हे त्याचे उद्दिष्ट आहे. अॅमेझॉन अशा प्रणालीवर काम करत आहे ज्यामुळे अॅलेक्सा, त्याचा व्हॉइस असिस्टंट, एका मिनिटापेक्षा कमी वेळ बोलणाऱ्या व्यक्तीचे ऐकल्यानंतर कोणत्याही आवाजाचे अनुकरण करू शकेल.
- अॅमेझॉनचे उद्दिष्ट आठवणींना पुनरुज्जीवित करणे आणि लोकांना दिलासा देण्याचे आहे, पण यासारख्या वैशिष्ट्याचा देखील गैरवापर केला जाऊ शकतो, अशी भातीही व्यक्त होत आहे.
- संमतीशिवाय सेलिब्रिटींच्या आवाजात या फिचरचा गैरवापर केला जाण्याची शक्यता आहे.