मुक्तपीठ टीम
जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस आज ५ जुलै रोजी अॅमेझॉनचं सीईओ पद सोडत आहेत. त्यांच्यानंतर या पदाची जबाबदारी एंडी जेसी यांच्याकडे असेल. ५ जुलै हा दिवस माझ्यासाठी अत्यंत भावूक दिन आहे. २७ वर्षांपूर्वी ५ जुलै १९९४ रोजी अॅमेझॉनची सरुवात केली होती, अशा शब्दात बेजोस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता बेजोस हे अंतरराळ यात्रा करणार आहेत.
View this post on Instagram
बेजोस आपल्या भावासोबत अंतराळ यात्रा करण्याच्या तयारीत
- बेजोस यांनी आपल्या एका सोशय मिडिया पोस्टमध्ये सांगितलं आहे की, जेव्हा ते ५ वर्षांचे होते, त्यावेळी त्यांनी अंतराळ यात्रा करण्याचं स्वप्न पाहिलं होतं.
- २० जुलै रोजी बेजोस आपल्या भावासोबत अंतरराळ यात्रेचा प्रवास सुरु करतील.
- बेजोस यांची नेट वर्थ ही १५.१ लाख कोटींची आहे.
- सीईओ पद सोडल्यानंतर बेजोस आपला अमूल्य वेळ अंतराळाशी संबंधित कंपनी ब्लू ओरिजिन, बेजोस अर्थ फंड, अॅमेझॉन डे वन फंड आणि अखबार द वाशिंगटन पोस्टसाठी देणार आहेत.
- यातली ब्लू ओरिजीन कंपनी ही चंद्रावर कॉलनी वसवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- या क्षेत्रात त्यांची स्पर्धा ही एलन मस्क यांची कंपनी स्पेस एक्ससोबत आहे.
View this post on Instagram
कसा राहिलाय जेफ बेजोस यांचा जीवनप्रवास?
- जॅक्लिन जोगेर्सन या केवळ १६ वर्षाच्या मुलीने प्रसिद्ध युनिसाईक्लिस्ट टेड जोर्गेन्सन यांच्याशी लग्न केलं.
- त्यानंतर १९६४ मध्ये जेफ यांचा जन्म झाला.
- त्यावेळी जॅक्लिन या शाळेत शिकत होत्या.
- बेजोस यांच्या जन्मानंतर १ वर्षातच त्यांचे आई वडील विभक्त झाले.
- प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जॅक्लिन यांनी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. यानंतर जॅक्लिन यांची ओळख माईक बेजोस यांच्याशी झाली.
- जेफ यांचं वय ४ वर्षांचं असताना जॅक्लिन यांनी माईक यांच्याशी लग्न केलं.
- सुरुवातीला बेजोस यांनी इंटरनेटवर पुस्तकांची विक्री करुन ऍमेझॉनला ऑनलाईन शॉपिंगचं स्वरुप प्राप्त करुन दिलं.
- सावत्र वडीलांनी दिलेल्या ३ लाख डॉलरपासून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. आता बेजोस यांची संपत्ती १५ लाख कोटींपर्यंत पोहोचली आहे.
कसा सुरु झाला जेफ बेजोस यांचा व्यवसाय?
- बेजोस यांनी कम्प्युटर सायंन्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरींगसह १९८६ मध्ये प्रिंसटन विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतलं आहे.
- बेजोस यांना १९८८ मध्ये इंटेल, बेल लॅब्स आणि एंडरसन कन्सल्टिंगकडून नोकरीची ऑफरही मिळाली होती.
- त्यांनी वॉल स्ट्रीटमध्ये गुंतवणूक संस्था असलेल्या डीई शॉ अँड कंपनीत नोकरी सुरु केली.
- फक्त ८ वर्षातच ते त्या कंपनीचे उपाध्यक्ष झाले.
- १९९३ मध्ये त्यांनी कंपनीला रामराम करत ऑनलाईन बुकस्टोर लाँच केलं.
- जेफ बेजोस यांना लहानपणापासूनच प्रत्येक गोष्टीबाबत उत्सुकता होती.
- त्यामुळे बेजोस यांनी घरातलं गॅरेजचं रुपांतर प्रयोगशाळेत केलं.
- शाळेत असतानाच बेजोस यांनी आपला पहिला व्यवसाय द ड्रीम इन्स्टिट्यूटची सुरुवात केली.
- हा एक शैक्षणिक उन्हाळी कॅम्प होता. ज्यात सहभागी होणाऱ्या ६ विद्यार्थ्यांमार्फत बेजोस यांनी ६०० डॉलर जमावले.
- ५ जुलै १९९४ रोजी त्यांनी आपल्या वडीलांनी दिलेल्या ३ लाख डॉलरची ऍमेझॉनमध्ये गुंतवणूक केली.
- ऍमेझॉनची वेबसाईट बीटा टेस्टिंगसाठी त्यांनी ३०० मित्रांची मदत घेतली.
- १६ जुलै १९९५ रोजी दक्षिण अमेरिकेच्या नदीच्या नावावर त्यांनी ऍमेझॉन डॉट कॉमची निर्मिती केली.
- ऍमेझॉनने ३० दिवसातच अमेरिकेसह ४५ देशांमध्ये पुस्तकांची विक्री केली.
- २ महिन्यात हीच पुस्तकांची विक्री आठवड्याला २० हजार डॉलरवर पोहोचली.
- १९९७ मध्येअॅमेझॉन ही कंपनी खासगी कंपनी झाली.
- यानंतर २ वर्षातच ही नवनिर्वाचित कंपनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पिछाडीवर टाकत ई कॉमर्स सेक्टरमध्ये नावारुपाला आली.
- अॅमेझॉनची स्थापना, कंपनी नावारुपाला येण्यात बेजोस यांच्या पत्नी मैकेंजी बेजोस यांचाही मोठा हातभार आहे.
- ३ सप्टेंबर १९९३ रोजी दोघांचं लग्न झालं. २५ वर्ष एकत्र राहिल्यानंतर २०१९ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
- मैकेंजी बेजोस यांना घटस्फोटानंतर जेफ बेजोस यांच्याकडून पोटगी स्वरुपात ३८ अरब डॉलर म्हणजेच २.६ लाख कोटी मिळाले.
- घटस्फोटानंतर मैकेंजी जगातल्या चौथ्या सर्वाधिक श्रीमंत महिला बनल्या.
- त्यांच्या कुटुंबात १ दत्तक घेतलेली मुलगा आणि ३ मुलं आहेत.