आपली प्रिय माणसं…आपले जीवलग…सभोताली वावरणारे…त्यांच्यापैकी कुणी कायमचं सोडून देवाघरी गेलं की मनात राहतेच एक व्याकुळता. त्यांच्या आठवणीत रमताना सतत डोळ्यासमोर येतात ते, मनात गुंजतो त्यांचा आवाज. आता अॅमेझॉनच्या एका संशोधनामुळे आपल्या आवडत्या माणसांचा आवाज ते इहलोकात नसतानाही ऐकणं शक्य होणार आहे.