मुक्तपीठ टीम
बाबा बर्फानींच्या भक्तांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाने यात्रेच्या तारखांची घोषणा केली आहे. यावेळी अमरनाथ यात्रा २८ जूनपासून सुरू होईल आणि २२ ऑगस्ट रोजी संपेल. झालेल्या बैठकीत श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाने हा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रवास फक्त बालटाल मार्गाने करता येईल. प्रवासाचा मुख्य मार्ग पहलगाम, चंदनवाडी, शेषनाग, पंचतरणी मार्गे जातो.
श्री अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी राजभवनात बोर्डाच्या सदस्यांची बैठक घेतली. यात प्रवासाच्या वेळापत्रकांसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अनेक राज्यांत कोरोना संसर्ग असल्यामुळे प्रवासादरम्यान कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जाईल.
मागील वर्षी कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यावरून बरेच वाद झाले होते. जम्मूच्या राजभवनात २२ एप्रिल रोजी निर्णय घेता येत न्हवता सर्वांचे याबाबत हो-नाही-हे-नाही सुरू होते. त्यावेळेस राजभवनाने सर्वप्रथम अमरनाथ यात्रा रद्द केल्याची माहिती दिली पण नंतर त्यांनीच प्रसिद्धीपत्रक रद्द केले. परंतु कोरोनामुळे ठरलेल्या तारखांवर प्रवास करणे शक्य नाही. तसेच, तेथे कोणाला जाऊन देणार की, नाही याचा निर्णय नंतर घेण्यात आला. शेवटी यात्रा रद्द झाली.
पाहा व्हिडीओ: