मुक्तपीठ टीम
उन्हामध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात गरम हवेचा परिणाम त्वचेवर होतो. तसेच कोणत्याही सन्स क्रीम किंवा कोल्ड क्रिमचा वापर केला तरी त्वचा एकदम निस्तेज व निर्जीव दिसते. अशात जर सर्हास उपलब्ध होणारा आणि आता जेल स्वरुपात दुकानावरही मिळणारा, गुणांने परिपूर्ण असणाऱ्या कोरफडचा वापर करणे फायदेशीर ठरु शकते.
कोरफडमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. विटामिन, मिनरल्स, सॅलिसिलिक अॅसिड, सॅपोनिन आणि साखरेने परिपूर्ण आहे. यामुळे त्वचेची पूर्ण काळजी घेतली जाते. त्यामुळे जाणून घेवूया कोरफडचे फायदे…
- कोरफडमुळे गरमीमध्ये त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे यावर आराम मिळतो. कारण त्यात त्वचेला थंड करण्याचे गुणधर्म आहेत.
- औषधी गुणधर्मांनी समृद्ध असणारा कोरफड सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयोगी आहे. तेलकट, कोरडी त्वचेपासून संवेदनशील त्वचा असणारी लोकही उन्हाळ्यात किंवा इतर ऋतुतही कोरफडचा वापर करु शकतात.
- कोरफडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. तसेच ज्यावेळी त्वचा कोरडी पडते तेव्हा कोरफड जेलचा वापर मॉइश्चरायजरसारखा करू शकता.
- कोरफडमुळे चेहऱ्यावर डाग, मुरुम कमी होण्यास मदत मिळते. तसेच वृद्धत्वाची लक्षणे आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतात.