मुक्तपीठ टीम
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळे गौप्यस्फोट होत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे एनसीबीवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्याचवेळी आता एनसीबीच्या आर्यन खान प्रकरणातील एका साक्षीदाराने धक्कादायक दावा केला आहे. साक्षीदार प्रभाकर साईलने एनसीबीचे एनसीबीचे समीर वानखेडे आणि अन्य साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण मिटवण्यासाठी गोसावी कुणाशीतरी २५ कोटींच्या डिलविषयी बोलत होता. त्याने नंतर १८ कोटींवर तडजोड केली. तसेच साईलच्या माध्यमातून ५० लाखांची ने-आण झाल्याचाही दावा त्याने केला आहे.
साक्षीदाराचे आरोप
- साक्षीदाराने सांगितले की, त्याने गोसावी आणि सॅम डिसूझा यांना २५ कोटी रुपयांबद्दल बोलताना ऐकले होते आणि १८ कोटी रुपयांमध्ये डील केली होती.
- गोसावी आणि सॅम यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना १८ पैकी ८ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.
- उरलेले दहा कोटी वाटून घेणार होते, असेही गोसावीला बोलताना ऐकल्याचे तो म्हणाला.
- एनसीबीने त्याला साक्षीदार बनवले आणि १० साध्या कागदांवर सह्या घेतल्या.
- त्याचे आधार कार्ड विचारण्यात आले.
- या आरोपांमुळे आता या प्रकरणाला वेगळेचं वळण आलं आहे.
त्याचवेळी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी या प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा दावा केला आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी अशोक जैन मुथा हे उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोसावी हा तोच व्यक्ती आहे ज्यांच्यासोबत आर्यन खानचा सेल्फी व्हायरल झाला होता आणि एनसीबीने या प्रकरणात स्वतंत्र साक्षीदार म्हणून बोलावले होते. प्रभाकरने सांगितले की, तो गोसावींचा बॉडीगार्ड म्हणून काम करत असे.