मुक्तपीठ टीम
बनावट सोशल मीडिया अकाउंट्समध्ये सातत्याने वाढत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हॉट्सअॅप, फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवर अनेक बनावट खाती कार्यरत आहेत. त्यामुळे खात्यांची गोपनियता राखण्यासाठी भारत सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. सरकार या बनावट अकाउंट्सवर आधीच्या नवीन नियमांतर्गत लगाम लावण्याचा प्रयत्न करत आहे.
सोशल मीडिया यूजर्ससाठी नवीन नियम
- भारत सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना सांगितले की, बनावट अकाउंट संबंधित नोटीस मिळताच २४ तासात ते अकाउंट्स बंद करावेत.
- सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठीच्या या नवीन आयटी नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
- त्यामुळे तक्रार मिळताच कारवाई करण्याशिवाय कोणताच पर्याय राहणार आहे.
- तसेच एखाद्या व्यक्तीने खेळाडू, चित्रपट अभिनेते, महिला कलाकार, राजकारणी इत्यादींचे बनावट प्रोफाईल तयार करुन आपले फॉलोअर्स वाढवण्याचा प्रयत्न करणारे अकाउंटही २४ तासात बंद केले जावेत.
- कारण बनावट प्रोफाइल तयार करण्यामागील कारणे ही वेगवेगळी असू शकतात.
पासवर्ड वापरा, डेटा चोरीपासून बचाव करा
सध्याचं दिवसगणित बदलत चाललेलं तंत्रज्ञान पाहता मोबाईल, लॅपटॉपची सिक्युरीटी ही फार महत्वाची झाली आहे. तुमची वैयक्तिक माहिती तसंच डेटा चोरी होऊ नये, यासाठी तुम्ही नेमकं काय करु शकता, याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात.
काय असतो पासवर्ड?
तुमचा डेटा, डिवाईसला सुरक्षित ठेवणाऱ्या एलिमेंटला पासवर्ड म्हणतात. सुरुवातीला पासवर्ड हे फक्त नंबर किंवा अल्फाबेट असायचे, मात्र आता तुमच्या बोटांचे ठसे, चेहरा आणि डोळेही पासवर्ड म्हणून वापरता येतात. पासवर्डचे फॉरमॅट आता वेगवेगळे झाले आहेत.
पासवर्डचा वापर कुठे होतो?
स्मार्टफोनमध्ये डेटा गरजेचा असो किंवा नसो, पण पासवर्डची सुरुवात इथूनच होते. त्याचबरोबर फोनमध्ये वापरले जाणारे जिमेल अकाउंट, सोशल मीडिया (व्हॉट्सॲप, फेसबुक, सिग्नल, ट्विटर इत्यादी) आणि वेगळे वेगळे ऍप्स, गॅलरीमध्ये पासवर्डचा वापर केला जातो. तसंच बँकिंग सोशल मीडिया यूपीआयमध्ये पासवर्डचा वापर केला जातो.
आपण रोज किती पासवर्डचा वापर करतो?
तज्ज्ञांच्या मते, पासवर्डचा वापर स्मार्टफोनमध्येच अधिक होतो. फोनला अनलॉक करण्यापासून ते काही महत्वाचे ऍप्स अनलॉक करेपर्यंत दिवसभरात डझनभर किंवा त्यापेक्षा जास्त पासवर्डचा वापर केला जातो. त्यासोबत, जे यूजर लॅपटॉपचा वापर करतात ते पण लॉगईनसाठी पासवर्डचा वापर करतात.
सुरक्षित पासवर्ड बनवणं महत्वाचं
• पासवर्डमध्ये कमीत कमी १० ते १५ अल्फाबेटचा वापर करा.
• यात नंबर्सचाही वापर करा.
• पासवर्डमध्ये एक अल्फाबेट कॅपीटलमध्ये जरूर ठेवा.
• स्पेशल कॅरेक्टर जसे की ! @#$%^&*) चा वापर करा.
• वेळोवेळी तुमचा पासवर्ड बदलत राहणे.
• जिथे शक्य आहे तिथे पासवर्डला ओटीपीने प्रोटेक्ट करा.
सोप्या शब्दांचा पासवर्ड बनवू नये
• पासवर्डमध्ये ८ पेक्षा कमी कॅरेक्टरचा वापर करु नये.
• पासवर्डमध्ये तुमचं नाव, बर्थ डेटचा वापर करू नये.
• तुमच्या यूजर नेमला सुद्धा पासवर्ड बनवू नये.
• पासवर्ड कधी कोणाला विचारून बनवू नये.