मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रासह देशात दुसरी लाट ओसरत असल्यानं निर्बंध हटवले जात आहेत. पण जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच आता सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. देशात कोरोनाची रिप्रोडक्शन व्हॅल्यू वाढत असल्याचे नवीन रुग्णांच्या संख्येवरून दिसत आहे. यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती यातून दिसत आहे. कोरोनाची रिप्रोडक्शन व्हॅल्यू एक वर गेली आहे, असा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. तज्ज्ञांच्या मते, देशात दुसऱ्या लाटेत ७ मे रोजी सर्वाधिक ४ लाख प्रकरण नोंदवली गेली होती, तेव्हाही रिप्रोडक्शन व्हॅल्यू ही १ होती. वाढती रिप्रोडक्शन व्हॅल्यू पाहता जास्तच सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
आर व्हॅल्यू म्हणजे रिप्रोडक्शन व्हॅल्यू म्हणजे काय?
- डेटा शास्त्रज्ञांच्या मते, आर फॅक्टर म्हणजे रिप्रोडक्शन व्हॅल्यू.
- रिप्रोडक्शन म्हणजे पुनर्उत्पादन, सोप्या भाषेत एका बाधित व्यक्तीद्वारे इतर किती व्यक्तींना संसर्ग होऊ शकतो, ते प्रमाण म्हणजे आर व्हॅल्यू किंवा रिप्रोडक्शन व्हॅल्यू
- जर आर फॅक्टर १.० पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ रुग्ण वाढत आहेत.
- कारण जेवढे रुग्ण त्यापेक्षा जास्त नवे तयार होत आहेत.
- आर फॅक्टर १.० पेक्षा कमी असणे किंवा खाली जाणे हे रुग्ण कमी होण्याचे लक्षण आहे.
- जर १०० लोकांना संसर्ग झाला असेल आणि ते १०० लोकांना संक्रमित करतात तर आर व्हॅल्यू १ असेल.
- परंतु जर ते ८० लोकांना संक्रमित करण्यास सक्षम असतील तर हे आर व्हॅल्यू ०.८० असेल.
देशातील एकंदर आर-व्हॅल्यू
- ९ मे ते ११ मे या कालावधीत आर-व्हॅल्यू ०.९८ एवढी होती.
- १४ मे ते ३० मे या कालावधीत ती ०.८२ एवढी झाली
- तर १५ मे ते २६ जून या कालावधीत ती ०.७८ पर्यंत खाली आली.
- त्यानंतर मात्र त्यात वाढ होऊ लागली आहे.
- २० जून ते ७ जुलै या कालावधीत आर-व्हॅल्यू पुन्हा वाढून ०.८८ एवढी झाली.
- ३ जुलै ते २२ जुलै या कालावधीत आर-व्हॅल्यू ०.९५ एवढी नोंदवली गेली आहे.
रुग्णसंख्या कुठे जास्त?
- ईशान्येतील आसाम, मिझोराम, नागालँड आणि मेघालय या राज्यांमध्ये आर-व्हॅल्यू १ पेक्षा जास्त आहे.
- त्याचबरोबर, देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या केरळ, कर्नाटक, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश राज्यातील आहेत.
- तसेच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मध्ये आर-व्हॅल्यू १ च्या आसपास आहेस, म्हणजेच येथे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.
- अधिक चिंताजनक बाब अशी की, मुंबई आणि पुणे वगळता सर्व प्रमुख महानगरांमध्ये आर-व्हॅल्यू १ पेक्षा जास्त आहे.
आर व्हॅल्यूतील वाढीमुळे सतर्कतेची आवश्यकता
- कोरोनाच्या रिप्रोडक्शन व्हॅल्यूमधील वाढ पाहता सतर्क राहण्याची गरज आहे.
- आर-व्हॅल्यूमधील वाढ म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये कोरोना पसरण्याचा वेग वाढला आहे.
- अशा परिस्थितीत, देशातील ज्या भागात संसर्गाचे प्रमाण जास्त आहे, तिथे कडक निर्बंध करावे लागणार आहेत.