मुक्तपीठ टीम
अभिनेता अक्षयकुमारचा भारतीय पासपोर्ट लवकरच येणार असल्याची चर्चा आहे. गेली काही वर्षे देशहिताच्या भूमिका मांडणाऱ्या अक्षयला त्यांच्या कॅनडियन पासपोर्टमुळे ट्रोल केले जाते. आता मात्र त्यांनी एका कार्यक्रमात आपला नवा पासपोर्ट येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच चित्रपट चालत नव्हते, तेव्हा कॅनडात जाऊन कामधंदा करण्यासाठी तेथील पासपोर्ट घेतल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आता येणारा पासपोर्ट भारतीयच असेल, असं मानलं जातं.
हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट २०२२ मध्ये नुकत्याच झालेल्या संवादात, त्यांनी टीकाकारांना प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की त्याला काम करायला आवडत तो म्हणाला की, ‘नागरिकत्व हे सांगत नाही की तुम्ही भारतीय आहात की नाही. मी २०१९ मध्ये सांगितले आणि अर्जही केला. मग महामारी आली आणि सर्व काही थांबले. लवकरच माझा नवीन पासपोर्ट येईल. तो हेही म्हणाला की माझाकडे कॅनडाचा पासपोर्ट असण्याचा अर्थ मी भारतीय नाही असा होत नाही.
- अक्षय त्याच्या नागरिकत्वामुळे खूप ट्रोल झाला आहे.
- अनेकवेळा त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनादरम्यान किंवा देशाबाबत कोणताही मुद्दा उपस्थित झाल्यावर हा मुद्दा उपस्थित केला जातो.
- अक्षयने अनेकदा याविषयी सांगितले आहे की, या देशाप्रती जी काही जबाबदारी आहे ती तो पूर्ण करतो.
- अक्षय सर्वात जास्त कर भरणा-या सेलिब्रिटींपैकी एक आहे.
- देशात किंवा देशातील कोणत्याही राज्यात कोणतीही समस्या येते तेव्हा तो मदतीसाठी नेहमीच पुढे असतो.
- त्यांनी अनेकवेळा मोठी मदत केली आहे.
कॅनेडियन नागरिकत्व का?
- अक्षयने कॅनेडियन नागरिकत्वाबाबत सांगितले की, एक काळ असा होता की त्याचे सर्व चित्रपट फ्लॉप होत होते.
- बॉलीवूडमधील करिअर संपले आहे, असे त्याला वाटले, त्यामुळे त्याने कॅनडाला जाऊन काम करावे, असा विचार केला.
- त्यानंतर त्याने तिथला नागरिकत्व घेतला.
- त्यानंतरच अक्षयचा एक चित्रपट सुपरहिट झाला आणि त्यानंतर त्याचे अनेक चित्रपट यशस्वी ठरले.
- मग अक्षय भारतातच राहून काम करत राहिला.
- त्यानंतर आता भारताचे नागरिकत्व परत घ्यावे, असे त्यांच्या मनात कधीच आले नाही.
जास्त चित्रपटावरून ट्रोल करणाऱ्यांना उत्तर
- अक्षयला एका वर्षात जास्त चित्रपट का करतो अले विचारताच अक्षय थोडा चिडला.
- अक्षयला म्हणाला की, मी वर्षभरात ३-४ चित्रपट करत असेल तर लोकांना काय अडचण आहे.
- मी फक्त काम करत आहे, कोणती चोरी करत नाही किंवा फसवणूक करत नाही.
- त्यामुळे मी फक्त काम केले तर मी ते करत राहीन.