आकाश दीपक महालपुरे
अख्या हिंदुस्थानात आपल्या अभिनयाने,आपल्या आवाजाने मना-मनावर अधिराज्य गाजवणारा हाच तो अवलिया.या लेकरानं समजायला लागल्यापासून या नटराजाचं बोटं पकडलयं ते आजपर्यंत सोडलेचं नाही,यालाचं तर म्हणतात खरा स्टार.आज या रंगभूमीच्या लेकराला अनेक पुरस्कार मिळाले.खरतरं,जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे या बीग-बीचं. जीवनात एक गोष्ट मान्य करायला काहीच हरकत नाही.बच्चन आजही जगण्याचा नवा आनंद देतोय. खचलेलं आयुष्य नक्षीदार बनवतोयं. अजूनही त्याच्या आवाजात ती चुणूक आहे.बच्चन १०० वर्षे जगणार,हो बच्चनच म्हणणार.शोले बॉय आहे मी. १९७५ ला जन्मलेल्या प्रत्येक पोराचा सुपरहिरो,फक्त बच्चन. पुढील २ दशकं ज्या पोरांनं फक्त बच्चनला पाहिलं, अनुभवलं.तो किती जवळचा वाटेल.
१९७५ चा बच्चनचा बघितलेला पहिला पिक्चर ‘ मुकदर का सिकंदर’.त्यातील त्याची ती बाईकवरची एन्ट्री..’ रोते हुये आते है सब.. ‘ क्या बात है ! ‘जिंदगी तो बेवफा है..’ म्हणत या जिंदागिने बच्चनला कितीतरी वेळा धोखा दिलायं..! पण बच्चन जीवनात कधीही डगमगला नाही.उलट त्या प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहिला.आर्थिक,शारीरिक, मानसिक सर्व स्तरावर लढा देत एकनिष्ठेने प्रामिणकपणे काम करीत राहिला आणि कित्येक प्रकारचे भयंकर आजार,अपघात,राजकारण, भ्रष्टाचाराचे आरोप,आर्थिक दिवाळखोरी,कर्जबाजारी अशी कित्येक प्रकारची संकटे वाट्याला येऊन सुद्धा पुरून उरला.खरचं बच्चन खुप ग्रेट आहे.ज्या वयात लोक पेन्शन घेऊन आरामखुर्चीत पडून नातवंडांच्या बाल-लीला बघत बसतात त्या वयात हाचं बच्चन रात्रंदिवस काम करतोयं.
आतापर्यंत तरी बच्चनचं कुठल्याही कामात पाट्या टाकणं दिसलं नाही.बच्चन नावाचा स्टार आजही १००% देतोयं. काही वर्षांपूर्वी त्याचा आलेला ‘गुलाबो सिताबो’ बघा मग कळेल. एक गोष्ट मात्र निश्चीत आहे,बच्चनला चांगले दिग्दर्शक लाभल्यानंतर त्याने नेहमीचं संधीचे सोने करून टाकले आणि आजपर्यंत उत्तरार्धात तो तेच करत राहिला.बच्चनची तिसरी इनिंग तर खुपचं जोरदार होती.बच्चन,१०० वर्षे जिवंत राहणारचं आहे. पण त्यानंतर पुढची १०० वर्षे सुद्धा जिवंत राहणार आहे.बच्चनचे किस्से,फॅन फॉलोअर्स,आणि त्याची रेखा सोबतची कथित प्रेमकहानी,त्याचे वागणे,नातवाच्या वयाच्या actor ला सुद्धा इज्जत देणे,कौन बनेगा करोडपती च्या सेटवरील त्याचा वावर,त्याची ती संवादफेक,’हम जहाँ खडे होते है,लाईन वही से शुरु होती है’ ,’आज खुश तो बहुत होंगे तुम’, ‘rishte में हम तुम्हारे बाप लगते है’, ‘ ११ मूलको की पुलीस डॉन का इंतजार कर रही है!’ ‘तुम मुझे ढुंढ रहे हो, और मैं तुम्हारा यहा इंतजार कर रहा हूँ’ सारखे कडक अजरामर डायलॉग्ज, ‘ मैं और मेरी तन्हाई’ म्हणणारा त्याचा धीरगंभीर,खर्जातला जोरकस आवाज,त्याचे चालणे,त्याचे बोलणे,त्याची नजर,त्याची smile, ‘मुछे हो तो नथुलाल जैसी..’ म्हणतानाची त्याची मिश्किली,sense of humour. कसं विसरू शकतो हे सगळं.?
बच्चनसोबत प्रत्येक अभिनेत्री मस्त दिसतं होती,खुलत होती,प्रसिद्धीच्या झोतात वाहत होती. आजही बच्चनचं गाणं वाजलं का प्रत्येकाला नाचायला होतं.प्रेम ओतू-ओतू होतं. ते ‘खैके पान बनारसवाला लागलं तर विचारुचं नका.’न सांगितलेलचं बरं.कित्येक मुलांनी तर कृष्णा कोयनेच्या प्रितीसंगमात नावेत बसून मैत्रीणीला सोबत घेऊन तो अवलिया प्रकारही केला आणि लई जाम मजा आली. बिग बी,म्हणजे सगळ्यासाठीचं लयं साॅलीड आहे. अनेक जणांना त्याने प्रेरणादायी बनवलं. वाईटं काळाशी झगडायला लावलं,आजारावर मात करायला शिकवलं.अगणित जणांसाठी बच्चन तर जीवाभावाचा मित्र म्हणून राहिलायं. बच्चन म्हणतोस तसं,यशाच्या पायरीवर पोहोचणं तसं फार अवघड नसतं पण तिचं यशाची पायरी सतत टिकवून ठेवणं हे मात्र नक्कीचं अवघडं असतं. बच्चनने हे यश आपल्या कलेच्या अविष्कारावर सहज साध्य केले आणि म्हणूनचं आजही आणि उद्याही बच्चनचं शहेनशाह राहील.
‘दिलीप कुमार’ नंतर हिंदी सिनेमाविश्वात अभिनय सम्राट म्हणून जर कोणी असेल तर तो फक्त बच्चनचं आहे. इतरांच्या लेखी ‘शाहरुख’ वगैरे असेलही पण मला तर दिलीप साहेबांचा वारसदार हा फक्त बच्चनचं वाटतो. यदा कदाचीत आजही जर बीग-बी कुठे दिसला,म्हणजे अगदी कुठल्याही साध्या जाहिरातीमध्ये ? तरीही प्रत्येकजण बीग-बीला आवर्जुन पाहतो.खरतरं,प्रत्येकाच्या मनात आजही बच्चनविषयी एक आदराचं स्थान आहे. ७० च्या दशकात ज्यावेळेस बच्चनने सिनेमासृष्टीत पाऊल टाकलं.,तेव्हा बच्चन एक इवलसं रोपटं होता,बच्चनचे त्यावेळेस १३ सिनेमे फ्लाॅप गेले.पण त्याचवेळेस पासून बच्चन हा दिवसेंदिवस सिनेमा बदलवत राहिला,स्वता:मध्येही आवश्यक तितका बदल करून घेतला.दिग्दर्शक नायकाची पारख करुन घेताना अनेक निकष त्याने योग्य ठरवले. सर्वांमध्ये स्वतचं: वेगळं एक स्थान निर्माण केलं,एक संस्थान तयार केलं आणि ‘जंजीर’, ‘दिवार’ ‘शोले’ च्या रूपानं सिनेमासृष्टीत एक ठिणगी जन्माला घातली.तसे तर बच्चनचे जंजीर आणि दिवार पाहतांना लोकांना काहितरी वेगळं फिलींग वाटायचं म्हणा.बच्चनने अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कित्येक लोकांना प्रेरीत देखील केलं.कित्येक लढवय्यांसाठी बच्चन प्रेरणास्थान ठरला.बच्चन म्हणजे मारधाडीसाठी आणलेला गुंड नाही. हे दाखवण्यासाठी मग बच्चनला ‘कभी – कभी’ आणि ‘सिलसिला’ यांसारखे क्लासिक रोमँटिक सिनेमे देऊन डोळ्यांतील विजयाचं पारणं फेडावे लागले. ‘त्रिशुल’ मधला ‘विजय कुमार’, ‘डाॅन’ मधला ‘विजय’ , ‘मुकद्दर का सिकंदर’ मधला बेमिसाल ‘सिकंदर’ , ‘मंझील’ मधला ‘अजय चंद्रा’, ‘नटवरलाल. ‘विजय पाल सिंग.’सुहाग’ मधला ‘अमित कपूर’ , ‘याराना’ मधला ‘किशन सिंग’, ‘माय नेम इज अॅन्थनी गॉन्साॅल्विस , मै दुनिया में अकेला हुँ’ अस म्हणणारा बच्चनच्या विनोदी अॅन्थनी सगळ्याच भुमिका बेमिसाल होत्या.
खरतरं इतक्या टोकाच्या भूमिका करणारा दिलीप कुमारा नंतर बच्चनचं एकमेवाद्वितीय आहे.’शक्ती’ मध्ये बच्चन आणि दिलीप साहेब पहिल्यांदा एकत्र आले.दोघेही प्रचंड लाडके.जुन्या जमान्यातील एक अभिनय मार्तंड विरुद्ध अभिनय शहेनशाह समोरासमोर होते.पण,बच्चनने संपूर्ण सिनेमात ज्या पद्धतीने दिलीप सरांचा जो आदर केला होता,त्याचवेळेस बच्चन प्रत्येकाला प्रचंड आवडला होता.आजही बरेच लोकं बच्चनचं नाव ‘लिजंड्स’ मध्ये घेतात.’लता’ताई,आमचा लाडका ‘धोनी’,’देव आनंद’,’सुनिल गावसकर’, ‘सचिन’,’द्रविड’, ‘गांगुली’,’आशा’ताई , ‘किशोर’दा ,’रफि’,’गुरुदत्त ‘गोल्डी’ आणि ‘अमिताभ बच्चन’ अशी आमची लिस्ट आहे.बच्चनशिवाय ती तर पूर्णच होत नाही.आज वयाच्या ८० व्या वर्षीही बच्चन ‘अँग्री यंग मॅन’ आहे.आजच्या अभिनय इंडस्ट्रीचा कोहिनूर आहे.खरतरं आजही दर रविवारी बच्चन आपल्या चाहत्यांना भेटायला,आपल्या बंगल्याबाहेर दर्शन द्यायला येतो.हात उंचावून अभिवादन करतो.’कूली’च्या अपघातापासून हा नेम आजही अव्याहत सुरुचं आहे.आजही बीग-बी सर्वांना रोज भेटतो ते कसे ? तर फेसबुक पोस्ट्समधून.कधी काही वैचारिकते मधून,कधी वडिलांच्या कवितेमधून, कधी स्वतःच्या आणखी काही मनोगतातून,कधी काही चित्रपटविषयक घोषणेमधून,कधी कसल्या कसल्या शुभेच्छांमधून,तर कधी एखाद्या कूल फोटो मधून.वयाच्या हिशोबात बघायचं तर,बच्चन प्रत्येकाच्या आजोबा आणि वडील यांच्या मधल्या वयाचा आहे.पण आजही तो त्याच्या पोस्ट्स मधून कधी आजोबा वाटत नाही.फेसबुकवर वडिलांच्या वयाचे अनेकजण रडताना दिसतात,पण जवळपास आजोबांच्या वयाचा असलेला बच्चन मात्र कायम चैतन्य आणतो.बच्चनच्या फेसबुक पोस्ट्समधून,कामातून कधीचं रडका सूर दिसला नाही.पण आता तर वाटतंयं त्याच्यातला हा ऐंशीच्या उंबरठ्यावर पोचलेला तरूण जर इतका पॉझिटिव्ह, इतका उत्साही असू शकतो तर तिशीही न गाठलेल्या स्वत:चं काय घोडं मारलंय ?
आज वयाच्या ८० व्या वर्षीही बच्चन मध्ये ‘अँग्री यंग मॅन’ आहे.ज्यांना तो म्हातारा वाटतो,त्यांना त्याने दाखवून दिले पाहिजे की,५० वर्षांपूर्वीचा दिवार मधला ‘विजय मेहता’ अजुनही माझ्यात जिवंत आहे.बच्चन मध्ये खर्या अर्थाने एक लढवय्या दडलेला आहे.टिकाकारांच्या भिंतीच्या भींती केवळ बच्चनच्या आवाजाने पडतील.
आकाश दीपक महालपुरे
(अनेक राज्यस्तरीय पुरस्कार विजेता युवा लेखक व कवी)
मो.नं..७५८८३९७७७२