मुक्तपीठ टीम
पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अकाली दलाने मायवतींच्या बहुजन समाज पार्टी म्हणजेच बसपाशी युती केली आहे. शिवसेनेप्रमाणेच भाजपाचा देशातील सर्वात जुना मित्र असणाऱ्या अकाली दलाने कृषि कायद्यांच्या मुद्द्यावर भाजपाची साथ सोडली होती. आता अकाली दल आणि बसपा २०२२मध्ये निवडणुकांना एकत्र सामोरे जातील.
शिवसेनेप्रमाणेच जुना मित्र सोडून नवी मैत्री
• शिवसेनेप्रमाणेच अकाली दलही भाजपाचा सुरुवातीपासून मित्र पक्ष होता.
• पंजाब निवडणुकीतील पराभवानंतर दोन्ही पक्षांमध्ये दुरावा येण्यास सुरुवात झाली होती.
• केंद्र सरकारने तीन कृषि कायदे आणल्याच्या निषेधार्थ अकाली दलाने भाजपाची साथ सोडली.
• अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी मोदी सरकारमधील अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
• त्यानंतर अकाली दल अडचणीत असलेल्या काँग्रेसविरोधात विजयी समीकरण जमवण्यासाठी मित्र पक्षाच्या शोधात होता.
• पंजाबातील अनुसुचित जातीच्या मतदारांवर बसपाचा चांगला प्रभाव आहे.
• त्यामुळे शिख धर्मीयांमध्ये मोठा प्रभाव असणाऱ्या अकाली दलाने बसपाशी मैत्री केली.
• आता २०२२च्या मध्ये पंजाब विधानसभा निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढतील.
ब्राह्मण – अनुसुचित समीकरण जुळवणारे सतीश मिश्रच युतीचे शिल्पकार?
• अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी नव्या युतीची घोषणा केली.
• युतीच्या घोषणेच्यावेळी तेथे बसपाचे सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा उपस्थित होते.
• सतीश मिश्र यांना मायावतींसाठी त्यांनी उत्तरप्रदेशात जुळवलेल्या ब्राह्मण अनुसुचित जातींच्या समीकरणासाठी ओळखले जाते.
• अकाली दल आणि बसपा २०२२ च्या विधानसभा निवडणुका आणि इतर निवडणुका एकत्र लढतील.
• मायावतींच्या नेतृत्वाखालील बसपासाठी पंजाबमधील ११७ विधानसभा जागांपैकी २० जागा सोडण्यात येतील.
• अकाली दल ९७ जागा लढवणार आहे.