मुक्तपीठ टीम
पाहुणे घरी गेल्यावर बोलेन सांगणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्यांनी गेले काही दिवस सोसावे लागत असलेल्या कारवाई, आरोपांच्या माऱ्यांचे पुरेपूर उट्टे काढले. भाजपा नेते बेछूट आरोप करत असल्याचे सांगत त्यांनी एकजण म्हणतो साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटींचा घोटाळा झाला, दुसरा म्हणतो १० हजार कोटींचा घोटाळा झाला. मात्र, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. साखर कारखान्यांच्या विक्रीची प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पार पडल्याचा दावाही केला. त्याचवेळी प्रतिहल्ला चढवत त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील ६५ सहकारी साखर कारखाने हे विकण्यात आले आहेत अथवा दुसऱ्या कंपन्यांना चालवायला घेतले आहेत, याची यादीही त्यांनी मांडली. त्या यादीत त्यांनी त्यांची किंमतही उघड केली. एकप्रकारे त्यांनी डाव उलटवण्याचा प्रयत्न केल्याचं मानलं जातं.
किरीट सोमय्यांच्या जरंडेश्वर प्रकरणीच्या आरोपांना प्रत्युत्तर
- भाजप नेते किरीट सोमय्या हे जरंडेश्वर साखर कारखान्याच्या विक्री मुद्द्यावरुन अजित पवार आणि त्यांच्या बहिणींना लक्ष्य करत आहेत.
- या आरोपांना अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात माझ्या नातेवाईकांवर आरोप केले जात आहेत.
- आरोप करणारे नेते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.
जरंडेश्वर विक्री व्यवहाराची मालिका
- जरंडेश्वर कारखाना सर्वप्रथम मुंबईस्थित गुरु कमोडिटी कंपनीने विकत घेतला होता.
- त्यानंतर हा कारखाना बीव्हीजी समूहाच्या हणमंत गायकवाड यांनी विकत घेतला होता.
- त्यासाठी हणमंत गायकवाड यांनी जरंडेश्वर शुगर लिमिटेड ही स्वतंत्र कंपनी स्थापन केली होती.
- मात्र, तोटा झाल्याने त्यांनी हा कारखाना दुसऱ्या कंपनीला विकून टाकल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
भंगाराच्या भावातही विकले गेले साखर कारखाने
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जरंडेश्वर साखर कारखान्याप्रमाणेच राज्यातील विकल्या गेलेल्या इतर कारखान्यांची सविस्तर यादी त्यांनी सादर दिली. त्यात कोणता कारखाना किती कोटीला विकला गेला त्याची आकडेवारीच मांडली आहे.
कोणता कारखाना कोणाला आणि कितीला विकला?
- २००७मध्ये नागपूरचा राम गडकरी सहकारी साखर कारखाना विकला गेला. १२ कोटी ९५ लाखाला विकला. नगरच्या प्रसाद शुगर्स कंपनीला विकला गेला.
- २००८ मध्ये अमरावतीचा श्री अंबादेवी सहकार कारखाना १५ कोटी २५ लाखला विकला गेला. मुंबईतील कायनेटिक पेट्रोलियम कंपनीने हा कारखाना विकत घेतला.
- २००९मध्ये वर्ध्याचा महात्मा सहकारी साखर कारखाना १४ कोटी १० लाखाला विकला गेला. नागपूरच्या महात्मा शुगर्स अँड पॉवर्स या कंपनीने हा कारखाना विकत घेतला.
- २००९ मध्ये भंडाऱ्याचा वैनगंगा सहाकरी कारखाना १४ कोटी १० लाखाला विकला गेला. वैनगंगा शुगर अँड पॉवर लिमिटेडने हा कारखाना खरेदी केला.
- २००९मध्ये यवतमाळच्या शंकर साखर कारखाना १९ कोटी २५ लाखाला विकला गेला. जालन्याच्या सागर वाईन्सने हा कारखाना विकत घेतला. नंतर त्यांनी डेक्कन शुगरला विकला.
- २००९मध्ये अकोला जिल्हा सहकारी साखर कारखाना १७ कोटी १० लाखाला विकला गेला. मुंबईच्या व्यंकटेश्वर अॅग्रो शुगर प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.
- २००९ मध्ये अमरावतीचा कोंडेश्वर कारखाना १४ कोटी ७२ लाखाला विकला गेला. जयसिंगपूरच्या सुदीन कन्स्लटन्सी प्रायव्हेट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.
- २००९ मध्ये नांदेडचा शंकर साखर कारखाना १४ कोटीला ७५ लाखाला विकला गेला. नांदेडच्या भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याने हा कारखाना विकत घेतला.
- २०१०मध्ये साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना ६६ कोटी ७५ लाख विकला गेला. हा कारखाना मुंबईच्या गुरु कमोडिटीने विकत घेतला.
- २०१०मध्ये परभणीचा नरसरी साखर कारखाना ४० कोटी २५ लाखाला विकला गेला. मुंबईच्या त्रिधारा शुगर प्रायव्हेट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.
- २०११मध्ये लातूरचा बालाघाट सहकारी साखर कारखाना ३१ कोटी ३६ लाखाला विकला गेला. लातूरच्याच सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजने हा कारखाना विकत घेतला.
- २०११ मध्ये नांदूरबारचा पुष्पदंतेश्वर साखर कारखाना ४५ कोटी ४८ लाखाला विकला गेला. मुंबईच्या अॅस्टोरिया ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला. नंतर त्यांनी आयान एलएलपी शुगर लिमिटेडला हा कारखाना विकला.
- २०१२ मध्ये सांगली जिल्ह्यातील जतमधील राजे विजयसिंह डफळे शेतकरी सहकारी कारखाना ४७ कोटी ८६ लाखाला विकला गेला. सांगलीच्याच राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने हा कारखाना विकत घेतला.
- २०१२मध्ये जालन्यातील सहकारी साखर कारखाना ४२ कोटी ३१ लाखाला विकला गेला. औरंगाबादच्या तापडीया कन्ट्रक्शनने हा कारखाना विकत घेतला.
- २०१२मध्ये नांदेडमधील हुतात्मा जयंतराव पाटील सहकारी साखर कारखाना ४५ कोटी ५१ लाखाला विकला गेला. नांदेडच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने हा कारखाना विकत घेतला. नंतर सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेडला त्याची विक्री करण्यात आली.
- २०१२मध्ये नांदेडचा जय अंबिका सहकारी साखर कारखाना ३३ कोटी ४८ लाखाला विकला गेला. कुंटुर शुगर अॅग्रो लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.
- २०१२मध्ये औरंगाबादचा कन्नड सहकारी साखर कारखाना ५० कोटी २० लाखाला विकला गेला. हा कारखाना बारामती अॅग्रो लिमिटेडने विकत घेतला.
- २०१३मध्ये नागपूरचा श्रीराम सहकारी साखर कारखाना ११ कोटी ९७ लाखाला विकण्यात आला. कोल्हापूरच्या व्यंकटेश्वरा प्रॉजेक्ट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.
- २०१३मध्ये औरंगाबादचा घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना १८ कोटी ६२ लाखाला विकला गेला. औरंगाबादच्या घृष्णेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.
- २०१३मध्ये जालन्याचा बागेश्वरी सहकारी कारखाना ४४ कोटी १० लाखाला विकला गेला. पुण्याच्या श्रद्धा एजन्सीने हा कारखाना विकत घेतला.
- २०१३मध्ये जळगावचा संत मुक्ताबाई सहकारी साखर कारखाना ३० कोटी ८५ लाखाला विकण्यात आला. पुण्याच्या श्रद्धा (मुक्ताई) एजन्सीने हा कारखाना विकत घेतला.
- २०१३ लातूरचा प्रियदर्शनी सहकारी साखर कारखाना ६९ कोटी ७५ लाखाला विकला गेला. लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याने या कारखान्याची खरेदी केली.
- २०१४0मध्ये सांगलीचा निनाईदेवी सहकारी साखर कारखाना २४ कोटी ३० लाखाला विकला गेला. दालमिया शुगर लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.
- २०१४ मध्ये नगरचा नगर तालुका सहकारी कारखाना ३८ कोटी २५ लाखाला विकला गेला. औरंगाबादच्या पियुष कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चरने हा कारखाना विकत घेतला.
- २०१५मध्ये बुलढाण्याचा शिवशक्ती आदिवासी सहकारी साखर कारखाना १८ कोटी १९ लाखाला विकला गेला. पुण्याच्या बिज सेक्युअर लँप्सने हा कारखाना विकत घेतला.
- २०१५ नगरच्या पारनेर सहकारी लिमिटेड हा कारखाना ३१ कोटी ७५ लाखाला विकण्यात आला. पुण्याच्या क्रांती शुगरने हा कारखाना विकत घेतला.
- २०१६मध्ये यवतमाळचा सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना हा ४३ कोटी ९५ लाखाला विकला गेला. नॅचरल शुगर्स अँड अलाईड इंडस्ट्रीजने हा कारखाना विकत घेतला.
- २०१६मध्ये नांदेडचा जय शिवशंकर सहकारी साखर कारखाना २८ कोटी ४ लाखाला विकला गेला. नांदेडच्या शिवाजी सर्व्हिस स्टेशनने हा कारखाना विकत घेतला.
- २०१७मध्ये सोलापूरच्या संतनाथ सहकारी कारखाना १३ कोटी २३ लाखाला विकला गेला.
- २०२०मध्ये सांगलीतील तासगाव पलूस सहकारी साखर कारखाना ३७ कोटी ६७ लाखाला विकला गेला. सांगलीच्या एसजीझेड अँड एसजीए शुगरने हा कारखाना विकत घेतला.